शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

'आवळा देऊन कोहळा काढण्याची मोदी सरकारची ही नेहमीची हातचलाखी,' ठाकरे गटाचा टीकेचा बाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 08:29 IST

निवडणुकांनंतर गॅस दरवाढ केल्याचं म्हणत ठाकरे गटानं मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

'निवडणुकांच्या तोंडावर दरकपातीचा गाजावाजा करायचा आणि मतदान आटोपताच दरवाढ करायची. आवळा देऊन कोहळा काढण्याची मोदी सरकारची ही नेहमीची हातचलाखी आहे. त्यातही गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत मोदी सरकार नेहमीच धूळफेक करीत असते,' असं म्हणत ठाकरे गटानं मोदी सरकारवर टीकेचा बाण सोडला.

'आताही पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी व्यावसायिक गॅसच्या दरकपातीची धूळ सरकारने जनतेच्या डोळय़ात फेकली आणि मतदान आटोपताच दरवाढ करून आपले ‘खायचे दात’ पुन्हा एकदा दाखविले. अर्थात, जनता आता तुमच्या या बनवाबनवीला फसणार नाही. २०२४ च्या निवडणुकीत जनता तुमचे दात तुमच्याच घशात घातल्याशिवाय राहणार नाही,' असं त्यांनी म्हटलंय. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटानं सामनाच्या संपादकीयमधून सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.

काय म्हटलेय अग्रलेखात?पाच राज्यांमधील मतदान पार पडले आणि मोदी सरकारने तोपर्यंत झाकून ठेवलेली दरवाढीची कुऱ्हाड बाहेर काढली. राजस्थान, मध्य प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा गुरुवारी संपला. तेलंगणा राज्यातील मतदान संध्याकाळी संपले, पाचही राज्यांचे ‘एक्झिट पोल’ समोर आले आणि एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढविण्यात आल्या, असं संपादकीयमध्ये नमूद केलंय.

'फसवाफसवीचा खेळ'पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर म्हणजे 16 नोव्हेंबर रोजी एलपीजीच्या पिंमती सरकारने तब्बल 50 रुपयांनी कमी करून सामान्यांना दिलासा वगैरे देण्याचे नाटक केले होते. अर्थात हा फसवाफसवीचा खेळ जनतेच्याही लक्षात आला आहे. तरीही त्याचा परिणाम कुठे ना कुठे, काही ना काही प्रमाणात होईल, या भरवशावर सध्याचे राज्यकर्ते असतात. त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीपूर्वी प्रामुख्याने गॅस आणि इंधन दरकपातीचा ‘प्रयोग’ मोठी जाहिरातबाजी करून लावला जातो आणि मतदानानंतर त्यावर पडदा टाकून दरवाढीचा फणा बाहेर काढला जातो, असं म्हणत सरकारवर यातून टीका करण्यात आलीये.'आता १ तारखेचं कारण'आता तर सरकारला १ तारखेचे आणखी एक कारण सापडलं आहे. कारण दर महिन्याच्या एक तारखेला एलपीजी गॅसच्या नवीन किंमती जाहीर होत असतात. मोदी सरकार एक बोट आता त्याकडेही दाखवेल आणि मतदान संपल्याचा गॅस दरवाढीशी काही संबंध नाही, अशी मखलाशी करेल. शिवाय ही दरवाढ फक्त व्यावसायिक गॅस सिलिंडरचीच आहे, घरगुती गॅसचे भाव आम्ही वाढविलेले नाहीत, असा मानभावीपणाही सत्ताधारी करीत असल्याचंही संपादकीयमध्ये नमूद करण्यात आलंय.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे