शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

उद्धव ठाकरेंसह कुटुंब जामनगरमध्ये; अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्याला हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 9:47 AM

या सोहळ्याला देशातीलच नव्हे तर विदेशातीलही अनेक पाहुणे उपस्थित राहणार आहेत. 

जामनगर - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याला अनेक दिग्गज कलाकार, नेते मंडळींनी हजेरी लावली. त्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब गुजरातच्या जामनगरला पोहचले. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही अंबानी यांच्या सोहळ्यात उपस्थिती लावली. 

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग सोहळ्याला उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे हे हजर होते. यावेळी माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी फोटो क्लिक केले. १ मार्च ते ३ मार्चपर्यंत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनसाठी अनेकजण जामनगरला येत आहेत. या सोहळ्याला देशातीलच नव्हे तर विदेशातीलही अनेक पाहुणे उपस्थित राहणार आहेत. 

फेसबुकचे मार्क झकरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स ते गुगलचे सुंदर पिचई असे झाडून सर्व बडे बडे उद्योगपती, उद्योजक या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. १ ते ३ मार्च असा हा तीन दिवसांचा सोहळा असणार आहे.

दरम्यान, राधिकाला मिळवून मी भाग्यशाली बनलो आहे. ती माझ्या स्वप्नांची राणी आहे. लहानपणी मी विचार केलेला की मी कधीच लग्न करणार नाही. कारण मला प्राण्यांप्रती खूप प्रेम होते, त्यांच्या देखभालीसाठी मी समर्पित झालो होतो. परंतु, जेव्हा मी राधिकाला भेटलो तेव्हा ती माझ्यासारखीच असल्याचे दिसले. तिलाही प्राण्यांबद्दल प्रेम आणि पाळण्याची आवड आहे, असे अनंत अंबानी म्हणाले. आजतकला त्यांनी ही मुलाखत दिली. 

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेAmruta Fadnavisअमृता फडणवीस