शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

“आव अन् साव हाच चेहरा आणि मुखवटा, दुसरे काय घडणार”; हेरगिरीवरुन ठाकरे गटाची केंद्रावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 09:14 IST

Thackeray Group Vs Central Govt: एकीकडे फोन टॅपिंग वगैरे काहीही नाही असा आव आणायचा आणि दुसरीकडे चौकशीचा फार्स करून देखावा करायचा, अशी टीका ठाकरे गटाने केली.

Thackeray Group Vs Central Govt: राजकीय विरोधकांवर पाळत ठेवणे, त्यांचे फोन चोरून ऐकणे हा सध्याच्या राज्यकर्त्यांचा आवडता छंद आहे. महाराष्ट्राचे फडणवीस सरकारही याला अपवाद नव्हते. त्यात देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना ‘अ‍ॅपल’ कंपनीने दिलेल्या फोन हॅकिंगच्या इशाऱ्याची भर पडली आहे.  एकीकडे फोन टॅपिंग वगैरे काहीही नाही असा ‘आव’ आणायचा आणि दुसरीकडे चौकशीचा फार्स करून आपण ‘साव’ असल्याचा देखावा करायचा. ‘तुका म्हणे चोरटाचि झाला साव। सहज न्याय नाही येथे।।’ असेच गेल्या नऊ वर्षांत देशात सुरू आहे. त्यामुळेच आधी पेगासस घडले आणि आता ‘अ‍ॅपल’. आव आणि साव हाच सरकारचा चेहरा आणि मुखवटा असल्याने दुसरे काय घडणार, अशी टीका ठाकरे गटाने केंद्र सरकारवर केली आहे. 

काही विरोधी नेत्यांच्या आयफोनवर ‘सरकार पुरस्कृत सायबर हल्ल्या’चा इशारा मिळाल्याचे हे प्रकरण असून ते गंभीर आहे. ‘अ‍ॅपल’ कंपनीने दिलेल्या अशा इशाऱ्याचे स्क्रीन शॉटस् च या सर्व नेत्यांनी पुराव्यादाखल दिले आहेत. तरीही सरकार म्हणते की, हे आरोप खोटे आहेत. मग आणखी कोणता पुरावा दिला म्हणजे सरकारला ते खरे वाटेल? केंद्रीय आयटी मंत्र्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. त्याच वेळी या प्रकरणाची चौकशी करू, असे स्पष्टीकरणही दिले आहे. आरोप जर खोटे असतील तर चौकशी कशासाठी करीत आहात, असा सवाल ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केला आहे. 

काहीतरी शिजत असावे, या शंकेला बळ प्राप्त होते

‘अ‍ॅपल’ कंपनीने जो इशारा दिला आहे तोच स्वयंस्पष्ट आहे. तुमच्या अ‍ॅपल आयडीशी संपर्क साधून तुमच्या फोनमधील माहिती मिळवली जात आहे, अशा शब्दांत जेव्हा एखादा फोन ऑपरेटर फोनधारकाला जाणीव करून देतो तेव्हा कुठेतरी, काहीतरी शिजत असावे, या शंकेला बळ प्राप्त होते, अशी शक्यता ठाकरे गटाने वर्तवली आहे. सत्ता पक्षाने निर्माण केलेल्या सायबर टोळय़ा आणि ‘ट्रोलधाडीं’कडून राजकीय विरोधकांवर समाजमाध्यमांद्वारा केले जाणारे राजकीय हल्ले, फोन टॅपिंग, हॅकिंग तसेच ‘टेहळणी’बाबत मोदी सरकारवर झालेले आरोप हेच गेली नऊ वर्षे देशात सुरू आहे. तीन-चार वर्षांपूर्वी ‘पेगासस’ प्रकरणाने मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. या प्रकरणाचा धुरळा तर सत्ताधाऱ्यांच्या डोळय़ांत एवढा गेला होता की, सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले होते, असे सांगत ठाकरे गटाने केंद्रावर हल्लाबोल केला. 

दरम्यान, आता ताज्या फोन टॅपिंग प्रकरणी चौकशी करण्याची घोषणा हीदेखील गाजराची पुंगीच आहे.  मोदी सरकार सत्तेत आल्यापासून राजकीय विरोधकांवर ‘पाळत’ ठेवण्यापासून त्यांच्या मागे केवळ राजकीय सूडभावनेतून केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावण्यापर्यंत अनेक गोष्टी घडल्या आहेत, घडत आहेत, असा निशाणा ठाकरे गटाने केंद्रावर साधला. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाCentral Governmentकेंद्र सरकार