शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut On Nana Patole: “मुंबईत काँग्रेसचा महापौर कधी होता, हे नाना पटोलेंना आठवतंय का?”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 14:02 IST

Sanjay Raut On Nana Patole: मुंबईचा राजा शिवसेनाच आहे, त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे, असा पलटवार संजय राऊतांनी नाना पटोलेंच्या टीकेवर केला.

Sanjay Raut On Nana Patole: मुंबईसह राज्यातील अनेक महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी काळात होऊ घातल्या आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे निवडणुका लांबणीवर पडत आहेत. यातच मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग रचनेवरून नाना पटोले (Nana Patole) यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. याला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर देत, मुंबईत काँग्रेसचा महापौर कधी होता, हे नाना पटोले यांना आठवतंय का, असा थेट सवाल केला आहे. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अनेक वर्ष काँग्रेसचा महापौर होता, त्यावेळी कधीच मुंबई पाण्याखाली गेली नाही, असा टोला लगावला होता. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुंबईत काँग्रेसचा महापौर कधी होता हे नाना पटोले यांना आठवते आहे का? त्यांनी काँग्रेसचा अभ्यास केला पाहिजे. अजूनही काही गोष्टी त्यांच्या अभ्यासातून सुटले आहेत. काँग्रेसच्या वाढीबद्दल आम्हालाही आस्था आहे. एकेकाळी काँग्रेसचे मुंबईवर राज्य होते पण तेव्हा मुंबई काँग्रेसला नेतृत्व होते. पण मुंबईचा राजा शिवसेनाच आहे, त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. मुंबई कधी तुंबली याची माहिती हवी असेल तर शिवसेनेच्या संदर्भ विभागातून मी पाठवतो, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला. 

आम्ही अजून शोधतोय ती आहे कुठे?

किरीट सोमय्या आमच्या सहकार्‍यांवर कुटुंबावर तोंड फाटेपर्यंत बोलतात. माझ्या मुलींच्या नावाने वायनरी फॅक्टरी आहे असा आरोप केला, आम्ही अजून शोधतोय ती आहे कुठे? मुंबईत पोहोचल्यानंतर किरीट सोमय्या यांच्या फ्रॉडचे, भ्रष्टाचाराचे एक मोठे प्रकरण उघड करणार आहे. किरीट सोमय्यांची भविष्यात जी प्रकरणे पुढे येतील ती पाहिल्यानंतर लोकं रस्त्यावर त्यांना फटकावल्या शिवाय राहणार नाहीत, या शब्दांत संजय राऊत यांनी नाना पटोलेंवर हल्लाबोल केला. ते एबीपी माझाशी बोलत होते. 

दरम्यान, दरवर्षी पावसात मुंबई पाण्याखाली येते. अनेक वर्ष काँग्रेसचा महापौर राहिला आहे. त्यावेळी कधीच मुंबई पाण्याखाली गेली नाही, असे पटोलेंनी म्हटले आहे. तसेच नाना पटोलेंनी सोयीनुसार वॉर्ड पुनर्रचना झाली असल्याचा आरोप केला आहे. आम्ही कोर्टात या बाबत न्याय मागण्याची भूमिका घेणार आहोत, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.   

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNana Patoleनाना पटोलेPoliticsराजकारण