शिवसेना - भाजपाचा जनाधार घटला तर राष्ट्रवादीचा वाढला महापालिका निवडणूक - शिवसेनेचे मताधिक्य १८,२१९ ने घटले * भाजपाची ६२,५७८ मतांची घसरगुंडी
By Admin | Updated: April 25, 2015 02:10 IST2015-04-25T02:10:40+5:302015-04-25T02:10:40+5:30
नारायण जाधव

शिवसेना - भाजपाचा जनाधार घटला तर राष्ट्रवादीचा वाढला महापालिका निवडणूक - शिवसेनेचे मताधिक्य १८,२१९ ने घटले * भाजपाची ६२,५७८ मतांची घसरगुंडी
न रायण जाधवनवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीत अंतिम मतदार यादीतील एकूण ८ लाख १५ हजार ६७ मतदारांपैकी ३ लाख ९३ हजार ९७३ मतदारांनी मतदान केले. यात सर्वाधिक ५२ जागा मिळविणार्या राष्ट्रवादीला १ लाख ५१ हजार ५८२ मते मिळाली असून शिवसेनेला १ लाख ४८३ मते मिळाली आहेत. तर सदस्य नोंदणीत १ लाख २८ हजार सदस्यांची नोंदणी करणार्या भाजपाला अवघ्या ३९,१४३ मतांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे भाजपाचे मताधिक्य विधानसभेत मिळालेल्या मतांपेक्षा निम्म्याहून अधिक कमी झाले आहे.* राष्ट्रवादीचे मताधिक्य २१,३१३ ने वाढले२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ऐरोली मतदार संघातून संदीप नाईक यांना ७६,४४४ तर बेलापूरमधून गणेश नाईक यांना ५३,८२५ अशी एक लाख ३० हजार २६९ मते मिळाली होती. त्यात २१ हजार ३१३ ने वाढ होऊन ती आता महापालिका निवडणुकीत १ लाख ९३ हजार ९७३ झाली आहेत. * शिवसेनेचे मताधिक्य १८,२१९ ने घटलेतर ऐरोलीतून विजय चौगुले ६७,७१९ आणि बेलापूरमधून विजय नाहटांनी ५०,९८३ असे एक लाख १८ हजार ७०२ मते मिळविणार्या शिवसेनेला या महापालिका निवडणुकीत मात्र एक लाख ४८३ मते मिळाल्याने त्यांचे मताधिक्य महापालिका निवडणुकीत १८,२१९ ने घटले आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत काँगे्रसने शिवसेनेला उघडउघड मदत केली होती. ती गृहीत धरली तर महापालिकेत शिवसेनेच्या मताधिक्याचा आकडा आणखी खाली येऊ शकेल.* भाजपाची तब्बल ६२,५७८ मतांची घसरगुंडीतसेच विधानसभेत ऐरोलीतून वैभव नाईक यांची ४६,४०५ आणि बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांची ५५,३१६ अशी एक लाख ७२१ मते घेऊन जोषात असलेल्या भाजपाला महापालिका निवडणुकीत अवघी ३९,१४३ मते मिळाली असून त्यांचे मताधिक्य ६२ हजार ५७८ ने घटले आहे.या निवडणुकीत ९२ जागा लढून १० जागा मिळविणार्या काँगे्रसला ४२,४८४ मते मिळाली आहेत. तर अन्य पक्षांना नोटाअंतर्गत मिळालेल्या ५३९१ मतांपेक्षा कमी मते मिळाली आहेत. यात नवी मुंबईत ३६ जागा लढविणार्या शेकापला मतदारांनी साफ नाकारले असून त्यांना अवघी ४०२९ मते मिळाली आहेत. तर युतीचा घटक पक्ष म्हणून मिरविणार्या रिपाइं - ९६१,राष्ट्रीय समाज पक्ष १२३ मिळाली आहेत.