शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी सोशल मीडिया सोडू नये, अन्यथा...; संजय राऊत यांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 11:24 IST

सोशल मीडियापासून दूर जाण्याचा इरादा मोदींकडून व्यक्त

ठळक मुद्देपंतप्रधान मोदींकडून सोशल मीडियापासून दूर जाण्याचा इरादा व्यक्तमोदींच्या ट्वीटवर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा खोचक टोलामोदींनी सोशल मीडियाचा त्याग केल्यास त्यांचे कोट्यवधी फॉलोअर्स अनाथ होतील- राऊत

नवी दिल्ली: आपण सोशल मीडियापासून दूर जाण्याच्या विचारात असल्याचं काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर जाहीर केलं. त्यानंतर सोशल मीडियावर एकच भूकंप झाला. याबद्दल रविवारी बोलू असं मोदींनी म्हटलंय. त्यामुळे मोदी रविवारी नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मोदींनी दिलेल्या सोशल संन्यासाच्या संकेतांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला. मोदींनी सोशल मीडियाचा त्याग केल्यास त्यांचे कोट्यवधी फॉलोअर्स अनाथ होतील, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे. सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. मोदींनी सोशल मीडियापासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्यास ही मंडळी अनाथ होतील. त्यांना अनाथ करणं योग्य नाही. कारण हीच मंडळी त्यांचे सायबर योद्धे आहेत. योद्धे सेनापतींच्या आदेशावरुन काम करतात. पण सेनापतींनीच सोशल मीडियाचं मैदान सोडलं तर मग फौज काय करणार, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहांनादेखील टोला लगावला. जेव्हा आमचे सायबर योद्धे मैदानात उतरतात, तेव्हा भाजपा निवडणूक जिंकते, असं एकदा शहांनी म्हटलं होतं. त्यामुळे हे सायबर योद्धे काय काम करतात, ते सगळ्यांना माहिती आहे, असंदेखील राऊत म्हणाले. सोशल मीडियाचा गैरवापर होत आहे. दंगली भडकवण्यासाठी, अफवा पसरवण्यासाठी, अपप्रचार करण्यासाठी सोशल मीडिया वापरला जात आहे. त्यामुळेच तर या संदर्भात कायदा करावा लागला, याकडेही राऊत यांनी लक्ष वेधलं. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियाला सोडचिठ्ठी देण्याचा धक्कादायक इरादा सोमवारी रात्री अचानक जाहीर केला. सोशल मीडियाच्या वापराच्या बाबतीत मोदींची तत्परता व चपखलता हा नेहमीच चर्चेचा व कौतुकाचा विषय आहे. असे असूनही जनतेशी संवाद साधण्याच्या या प्रभावी माध्यमांतून पूर्णपणे बाहेर पडण्याचा विचार त्यांनी का केला, हे समजू शकलेलं नाही. रात्री ८.५२ वाजता हा धक्का देताना मोदी यांनी लिहिले की, टि्वटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व यूट्यूब या सोशल मीडियावरील माझी अकाउंट्स येत्या रविवारपासून बंद करण्याचा विचार करत आहे. याविषयी पुढील माहिती नंतर देईन. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSocial Mediaसोशल मीडियाSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना