शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut On ED: ईडीचे समन्स पे समन्स; संजय राऊत म्हणतात, “जो डर गया वो मर गया, डर के माध्यम से ही...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 13:11 IST

Sanjay Raut On ED: संजय राऊतांनी चौकशीसाठी मुदवाढ मिळण्याबाबत केलेली मागणी फेटाळून लावत ईडीने पुन्हा समन्स बजावले आहे.

नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने सक्तवसुली संचालनालयाने (ED) जारी केलेल्या समन्सनुसार चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नसल्याने ७ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी येण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईडीकडे केली. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांनी राऊत यांची मागणी फेटाळून लावत २७ जुलै रोजी हजर राहण्याचे नवे समन्स जारी केले. यानंतर आता संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून ईडीवर निशाणा साधला आहे. 

यापूर्वी ईडीने संजय राऊत यांची १ जुलै रोजी १० तास चौकशी केली होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत, राकेशकुमार वाधवान, सारंगकुमार वाधवान यांच्या विरोधातही म्हाडा अधिकाऱ्यांनी तक्रार दिली होती. या घोटाळ्याची आर्थिक व्याप्ती मोठी असल्याने याप्रकरणी ईडीने चौकशीची सूत्रे हाती घेतली. ईडीने केलेल्या चौकशीदरम्यान त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून आले. यातच आता संजय राऊत यांनी ईडीवर टीका केली आहे. 

डर के माध्यम से ही...

संजय राऊत यांनी ओशो यांचा एक सुविचार ट्विट केला आहे. संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, मनुष्य का हमेशा डर के माध्यम से ही शोषण किया जाता है! जो डर गया वो मर गया. जय महाराष्ट्र! तत्पूर्वी, काही तासांपूर्वी संजय राऊत यांनी एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी वेळ वाईट असेल तर लोक तुमचा हात पकडण्यापेक्षा 'चुका' पकडतात, असे म्हटले होते. तर त्याआधी संजय राऊत यांनी, उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. 

दरम्यान, गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकासामध्ये १०३९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा ठपका ठेवत ईडीने संजय राऊत यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, संजय राऊत संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्ली येथे आहेत. त्यांच्या वकिलांनी ईडी कार्यालयात जाऊन राऊत यांना चौकशीसाठी ७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचे पत्र अधिकाऱ्यांना सादर केले. मात्र, ईडीने ही मागणी फेटाळली. त्यामुळे संजय राऊत यांना २७ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय