शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांनी घेतली कोरोनाची लस, संजय राऊतांनी लगावला टोला; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 11:04 IST

Pm Narendra Modi Coronavirus Vaccination : पंतप्रधानांनी आज घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस

ठळक मुद्देपंतप्रधानांनी आज घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लससरकारी रूग्णालयात मिळणार मोफत लस, खासगी रुग्णालयात द्यावे लागणार २५० रूपये

आजपासून म्हणजेच १ मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेलाही कोरोनाची लस घेण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुकही केलं आणि त्यांना टोलाही लगावला. "पंतप्रधानांनी लस घेतल्यामुळे आता जनतेचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे मी त्यांचं स्वागत करतो. त्यांनी लस घेतली त्यावर विश्वास दाखवला हे महत्त्वाचं आहे. अमेरिकेतही जेव्हा जो बायडेन यांनी लस घेतली, तेव्हा तेथील जनतेलाही ही लस आपलं रक्षण करेल असा विश्वास वाटला. आज आपल्या देशात पंतप्रधानांनी लस घेतली हे कौतुकास्पद आहे," असं राऊत म्हणाले. त्यांनी ही लस घेण्यामागे निवडणुकाही कारण असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. याबाबत संजय राऊत यांना सवाल करण्यात आला. "याकडे सर्वांनी राष्ट्रीय एकात्मता म्हणून पाहिलं पाहिजे. ही फक्त काँग्रेसची मक्तेदारी नाही. मोदीही काँग्रेसच्या मार्गावर पुढे जात आहेत. यापूर्वी काँग्रेसचे नेतेही अशीच भूमिका घेत होते. सगळ्या देशातील राज्यातील नेते आपल्या जवळपास असतील याची काळजी घेतली जात होती. निवडणूक हा तुमच्या डोक्यातील किडा आहे. तो त्यांच्या डोक्यात कदाचित नसेलही. ते फार सरळमार्गी आहेत," असंही ते म्हणाले. काय म्हणाले मोदी?"एम्स रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीनं काम केलं, ते कौतुकास्पद आहे." तसंच, लसीकरणासाठी पात्र असलेल्यांना आवाहन करत भारत कोरोनामुक्त बनवूयात, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. कोणाला लस मिळणार, किती रुपये द्यावे लागणार?कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा राबविला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, या टप्प्यात २७ कोटी नागरिकांचं लसीकरण केलं जाईल. जवळापास १२ हजार सरकारी रुग्णालयात कोरोना लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसंच खासगी दवाखान्यात ही लस घ्यायची असेल तर, एका लसीसाठी २५० रुपये द्यावे लागतील.

तुमच्या सोयीनुसार लस घेता येणार नाहीसीरम इन्टिट्यूचची कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोनच लसी भारतात उपलब्ध आहेत. लसीकरणावेळी जी लस उपलब्ध असेल ती लस घ्यावी लागेल. आपल्या सोयीनुसार लस घेण्याची सुविधा सध्यातरी नाही. तसंच, लस घेण्यासाठीची वेळ आणि ठिकाण म्हटलं तर ते निवडण्याचा पर्याय लसीकरणाची नोंदणी करतानाच उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीAIIMS hospitalएम्स रुग्णालयShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत