शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

West Bengal Assembly Election 2021: ठाकरेंचा निर्णय झाला! पश्चिम बंगाल निवडणुकीबद्दल शिवसेनेची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 13:30 IST

shiv sena decides not to contest west bengal assembly election 2021: ममता बॅनर्जींसोबत खंबीरपणे उभं राहण्याचा शिवसेनेचा निर्णय

मुंबई: विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं पश्चिम बंगालमधील राजकारण तापलं आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी थेट लढत होणार असल्याचं चित्र दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक नेत्यांनी तृणमूल सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं. त्यामुळे तृणमूलच्या सर्वेसर्वा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर आव्हान उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेनं एक महत्त्वाची घोषणा केली आहे.बिहारमध्ये शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीत काही जागा लढवल्या होत्या. त्यामुळे पश्चिम बंगालमध्येही शिवसेना ताकद आजमावून पाहणार का, अशी चर्चा सुरू होती. याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. 'शिवसेना बंगालमध्ये निवडणूक लढवणार की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेनंतर याबद्दलची अपडेट मी तुम्हाला देत आहे,' असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'सध्याची परिस्थिती पाहता दीदी विरुद्ध सगळे असा सामना आहे. सगळे एम, म्हणजेच मनी, मसल आणि मीडिया एकट्या ममतांविरोधात वापरले जात आहेत. त्यामुळे बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचा आणि ममता दीदींसोबत ठामपणे उभं राहण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. ममता दीदींना उत्तम यश लाभो. कारण त्या बंगालच्या खऱ्या वाघीण आहेत,' असं राऊत यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटलं आहे. 

पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक

>> पहिला टप्पा -  २७ मार्च मतदान>> दुसरा टप्पा - १ एप्रिल मतदान>> तिसरा टप्पा - ६ एप्रिल मतदान>> चौथा टप्पा - १० एप्रिल मतदान>> पाचवा टप्पा - १७ एप्रिल मतदान>> सहावा टप्पा- २२ एप्रिल मतदान>> सातवा टप्पा- २६ एप्रिल मतदान>> आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान२ मे रोजी जाहीर होणार विधानसभेचा निकाल

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपा