शशिकलांना दिनकरन तुरुंगात जाऊन भेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 04:11 IST2017-12-29T04:11:48+5:302017-12-29T04:11:53+5:30
बंगळुरू : तामिळनाडूतील आर. के. नगर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले अपक्ष आमदार टी. टी. व्ही. दिनकरन यांनी गुरुवारी सकाळी अखिल भारतीय अण्णा द्रमुकच्या नेत्या शशिकला यांची येथील मध्यवर्ती कारागृहात सुमारे तासभर भेट घेतली.

शशिकलांना दिनकरन तुरुंगात जाऊन भेटले
बंगळुरू : तामिळनाडूतील आर. के. नगर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले अपक्ष आमदार टी. टी. व्ही. दिनकरन यांनी गुरुवारी सकाळी अखिल भारतीय अण्णा द्रमुकच्या नेत्या शशिकला यांची येथील मध्यवर्ती कारागृहात सुमारे तासभर भेट
घेतली.
निवडणुकीत विजयी झाल्यानंतर दिनकरन यांची ही पहिलीच भेट आहे. ते ४० हजारपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले. उत्पन्नाच्या ज्ञात मार्गांपेक्षा जास्त संपत्ती कमावल्याच्या खटल्यात शशिकला सध्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. दिनकरन यांनी शशिकला यांचे या वेळी आशीर्वाद घेतले व उभयतांमध्ये राज्यातील राजकीय घडमोडींवर चर्चा झाली.