शिर्डी संस्थानने जरूरला दिले ५० लाख

By Admin | Updated: July 15, 2015 23:12 IST2015-07-15T23:12:26+5:302015-07-15T23:12:26+5:30

किनवट : तालुक्यातील राजगडला ढाळीचे बांध व शेततळ्यासाठी सिद्धीविनायकाकडून ५० लाख मिळाले़ आता शिर्डी संस्थानकडून जरूर गावासाठी ५० लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी डॉ़तुकाराम मोटे यांनी दिली़

Shirdi Sansthan gave 5 million to Surender | शिर्डी संस्थानने जरूरला दिले ५० लाख

शिर्डी संस्थानने जरूरला दिले ५० लाख

नवट : तालुक्यातील राजगडला ढाळीचे बांध व शेततळ्यासाठी सिद्धीविनायकाकडून ५० लाख मिळाले़ आता शिर्डी संस्थानकडून जरूर गावासाठी ५० लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी डॉ़तुकाराम मोटे यांनी दिली़
किनवट तालुक्यातील २२ गावांत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची वेगवेगळी कामे करण्यात आली़ यामुळे गावांची भविष्यातील पाणीटंचाई दूर होणार आहे़ या कामांची पाहणी व तपासणी करण्यासाठी डॉ़मोटे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी बी़एम़कांबळे आदी १४ जुलै रोजी किनवट येथे आले होते़ यावेळी तालुका कृषी अधिकारी संजय कायेंदेही उपस्थित होते़ झळकवाडी, इस्लापूर भागात सिमेंट नाला बांध खोलीकरण, इस्लापूर येथील कामाची पाहणीही अधिकार्‍यांनी केली़ यावेळी एका शेतकर्‍याने जलयुक्त शिवाराला प्रथम आम्ही विरोध केला होता, आता मात्र जलयुक्तमुळेच विहिरीचे पाणी एकदम वर आल्याने हरभरा व गहू पिके घेतल्याचे सांगितले़ कोरडवाहू शेती अभियानामध्ये जरूरला ६५ स्प्रिंकलर सेट दिल्याचे तालुका कृषी अधिकारी संजय कायेंदे यांनी संागून १२ हेक्टरवर ठिबक सिंचन झाल्याचे नमूद केले़

Web Title: Shirdi Sansthan gave 5 million to Surender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.