निपाणी शहरात वाळवंटातील जहाजांची धूम
By Admin | Updated: May 12, 2014 19:09 IST2014-05-12T19:09:37+5:302014-05-12T19:09:37+5:30
बालचमूंची उंटावरून सफर, उंटमालकांची कमाई

निपाणी शहरात वाळवंटातील जहाजांची धूम
ब लचमूंची उंटावरून सफर, उंटमालकांची कमाईनिपाणी : उन्हाळ्याच्या सुटीत निपाणी शहरात गेल्या दोन दिवसांपूर्वी वाळवंटातील जहाज समजल्या जाणार्या उंटाचा कळप दाखल झाला आहे. त्यामुळे शहरात या उंटांची धूम सुरू असून, उंट पाहण्यासह बालचमूंची उंटावरून सफर करण्याची लगबग दिसत आहे. एका व्यक्तीला उंटावर बसवून सफर करण्यासाठी १० रुपये आकारण्यात येत असल्याने उंट मालकांची चांगलीच कमाई होत आहे. निपाणी शहरातील शिवाजी चौक, बेळगाव नाका, अशोक नगर, महादेव गल्ली, दर्गाह गल्ली, भीमनगर, साखरवाडी, आदींसह उपनगरात दिवसभर उंट मालक उंटाना घेऊन गल्ली-बोळात फिरत आहेत. एकाचवेळी तीन ते चार मुलांना उंटाच्या पाठीवर बसवून १०० मीटर अंतरावरून सफारी केल्यास ४० रुपयांची कमाई होत आहे. अनेक पालक आपल्या मुलांना उंटावर बसवून सफारी करीत आहेत. एकंदरीत ऐन उन्हाळ्याच्या सुटीत बालचमंूना उंटावरची सफर आनंददायी वाटत आहे.प्रतिनिधी.12एनपीएन02निपाणी शहरातून उंटावरून सफर करणारे बालचमू व त्यांना पाहण्यासाठी होणारी गर्दी.छाया : राजेंद्र हजारे.