शिंदे यांच्या कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध

By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:37+5:302015-08-19T22:27:37+5:30

शिर्डी- पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्लयाचा भाजपाच्या शिर्डी शहर व तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

Shinde's office attacks protest | शिंदे यांच्या कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध

शिंदे यांच्या कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध

र्डी- पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्लयाचा भाजपाच्या शिर्डी शहर व तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यसरकारने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला.संभाजी ब्रिगेडने जातीय विद्वेष निर्माण करण्यासाठी विरोध केला असून त्याचाच भाग म्हणून गृहमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयावर हल्ला केला आहे.सदरची घटना अत्यंत क्लेषदायक व निंदनीय आहे.कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणी केल्यास त्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल. चौकशी करुन तत्काळ कायदेशीर कारवाई करावी व समाजकंटकांना तत्काळ अटक करावी.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नितिन कापसे,शिर्डी शहराध्यक्ष राजेंद्र गोंदकर,तालुका अध्यक्ष नंदकुमार जेजुरकर,सरचिटणीस सुनील वैजापूरकर, विनोद संकलेचा,सचिन शिंदे अशोक पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
-----------------------------------------------------------------
1908-2015-साई-02राम शिंदे कार्यालय तोडफोड निषेध,जेपीजे

Web Title: Shinde's office attacks protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.