शीला कौल यांचे निधन

By Admin | Updated: June 15, 2015 00:14 IST2015-06-15T00:14:34+5:302015-06-15T00:14:34+5:30

माजी केंद्रीय मंत्री, हिमाचल प्रदेशच्या माजी राज्यपाल आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला कौल यांचे शनिवारी सायंकाळी अल्पश: आजाराने गाझियाबाद

Sheela Kaul dies | शीला कौल यांचे निधन

शीला कौल यांचे निधन

गाझियाबाद : माजी केंद्रीय मंत्री, हिमाचल प्रदेशच्या माजी राज्यपाल आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला कौल यांचे शनिवारी सायंकाळी अल्पश: आजाराने गाझियाबाद येथील रुग्णालयात निधन झाले. त्या १०१ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या मागे सेवानिवृत्त सनदी अधिकारी गौतम कौल आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशासक विक्रम कौल हे दोन पुत्र आणि उत्तर प्रदेशच्या माजी सूचना मंत्री दीपा कौल ही कन्या आहे.
रविवारी सायंकाळी ४.३० वाजता कौल यांच्या पार्थिवावर हिंडन नदीकाठच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सोनिया गांधी यांनी शोक व्यक्त करून शीला कौल यांच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहिली. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Sheela Kaul dies