तिने 16 तासांत 451 हातांवर काढली मेहंदी

By Admin | Updated: May 24, 2017 18:21 IST2017-05-24T18:21:10+5:302017-05-24T18:21:10+5:30

या जगात अजब गजब विक्रम बनवणाऱ्यांची कमी नाही. अहमदाबादमधील सुफिया रेशमवाला हिनेही असाच आगळावेगळा जागतिक विक्रम

She took 451 hands in 16 hours | तिने 16 तासांत 451 हातांवर काढली मेहंदी

तिने 16 तासांत 451 हातांवर काढली मेहंदी

>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 24 - या जगात अजब गजब विक्रम बनवणाऱ्यांची कमी नाही. अहमदाबादमधील सुफिया रेशमवाला हिनेही असाच आगळावेगळा जागतिक विक्रम आपल्या नावे केला आहे. सुफियाने  अवघ्या 16 तासांमध्ये तब्बल 451 हातांवर मेहंदी काढण्याचा विक्रम केला आहे. तिच्या या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे. एका हातावर मेहंदी काढण्यासाठू सुफिया हिला 2 मिनिटे लागतात. आता येत्या काळात आपलाच विक्रम मोडित काढण्याचा मानस तिने व्यक्त केला आहे. 
 
सुफिया हिने 24 तासांत 421 हातांवर मेहंदी काढण्याचे लक्ष्य स्वत:समोर ठेवले होते. मात्र केवळ 16 तासांमध्ये तिने अपेक्षेहून अधिक मोठे लक्ष्य तिने गाठले.  हा विक्रम करण्यासाठई सुफिया हिने चिपा जमात चॅरिटेबल ट्रस्टमध्ये 22 मे रोजी सकाळी 9 वाजता मेहंदी काढण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून पुढच्या 16  तासांत तिने साडेचारशे हातांवर मेहंदीची कलाकुसर केली. याआधी सर्वाधिक हातांवर मेहंदी लावण्याचा विक्रम महाराष्ट्रातील मेहंदी कलाकार धनश्री हेंद्रे हिच्या नावावर होता. तिने 32 तासांमध्ये 408 हातांवर मेहंदी काढली होती.
 
सुफिया हिने 421 हातांवर मेहंदी काढण्याचे आपले लक्ष्य 15 तास आणि 25 मिनिटांमध्येच पूर्ण केले. त्यानंतरही मेहंदी काढणे सुरू ठेवत तिने एकूण 451 हातांवर मेहंदी काढली. सकाळी 9 वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत सुफिया हातांवर मेहंदी काढत होती.   
 

Web Title: She took 451 hands in 16 hours