शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
4
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
5
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
6
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
7
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
8
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
9
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
10
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
11
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
12
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
13
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
14
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
15
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
16
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
17
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
18
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
19
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती

बलात्काराला विरोध केला म्हणून कात्रीनं बेशुद्ध होईपर्यंत भोसकले, मुलीची प्रकृती गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 19:48 IST

अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

ठळक मुद्दे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १० लाखांची नुकसान भरपाई कुटुंबियांना देणार असल्याची माहिती दिली आहे. आज १० लाख रुपये आजच कुटुंबियांच्या बँक खात्यात जमा करणार असल्याचं केजरीवाल म्हणाले आहेत. 

देशाच्या राजधानीत २०१२ मध्ये घडलेल्या निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. बलात्काराला विरोध करणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर गंभीर हल्ला करण्यात आला आहे. मुलीला कात्रीनं वारंवार भोसकण्यात आल्यानं तिची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १० लाखांची नुकसान भरपाई कुटुंबियांना देणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच याप्रकरणातील आरोपी जेरबंद असून अल्पवयीन मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली. तसेच आज १० लाख रुपये आजच कुटुंबियांच्या बँक खात्यात जमा करणार असल्याचं केजरीवाल म्हणाले आहेत. दिल्लीतल्या पश्चिम विहारमधील पीरा गरही परिसरात गुरुवारी धक्कादायक घटना घडली होती. १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाला. बलात्काराला तिनं विरोध केला. त्यामुळे बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीनं तिच्यावर कात्रीनं जोरदार हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. सध्या तिच्यावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.पोलिसांना आरोपीच्या शरीरावर काही जखमा आढळून आल्या आहेत. त्यातून अल्पवयीन मुलीनं बलात्काराला विरोध केल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमली पदार्थांच्या आहारी गेलेला आहे. त्याला आधी इतर गुन्ह्यांमध्ये अटक झाली होती. तो तुरुंगातही गेला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला. पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेऊन आणि जवळपास १०० जणांची चौकशी केल्यानंतर आरोपीला अटक केली. मात्र पोलिसांनी त्याची ओळख सांगितलेली नाही.आरोपी चोरीच्या उद्देशानं घरात शिरला होता. त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. घरात शिरल्यानंतर त्याला अल्पवयीन मुलगी दिसली. त्यानं तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिनं प्रतिकार केला. त्यावेळी आरोपीनं तिच्यावर कात्रीनं हल्ला केला. त्यानं अनेकदा तिला कात्रीनं भोसकलं. त्यामुळे मुलीच्या गुप्तांगाला आणि आतड्यांना गंभीर इजा झाली. तिच्यावर डोक्याला फ्रॅक्चरदेखील झालं आहे. बेशुद्ध होईपर्यंत मुलीनं प्रतिकार केला होता.

 

टॅग्स :Rapeबलात्कारArvind Kejriwalअरविंद केजरीवालChief Ministerमुख्यमंत्रीPoliceपोलिसArrestअटक