तिने सापाशी लग्न केले

By Admin | Updated: June 9, 2017 03:54 IST2017-06-09T03:54:51+5:302017-06-09T03:54:51+5:30

तुम्ही कोणाला सापावर प्रेम करताना बघितले आहे का? सामान्यत: गारुडी लोकांशिवाय सापांना कोणी पाळत नाही

She got married to a snake | तिने सापाशी लग्न केले

तिने सापाशी लग्न केले

तुम्ही कोणाला सापावर प्रेम करताना बघितले आहे का? सामान्यत: गारुडी लोकांशिवाय सापांना कोणी पाळत नाही. सापाच्या विषाचीही भीती असते; परंतु ओडिशातील बिमबाला दास (३०) हिचे सापावर प्रेम जडले आहे. त्याच्या प्रेमाचा प्रभाव असा की, तिने सापासोबत लग्न करून सप्तपदीही केली. बिमबालाच्या घराजवळील बिळात राहणाऱ्या सापाबद्दल तिला एवढे प्रेम निर्माण झाले की, तिने त्याच्याशी लग्नच ठरवले. या लग्नाला सगळा गाव लोटला होता व तिला त्यापासून अडवण्याऐवजी सगळ्या गावकऱ्यांनी तिला साथ दिली. हिंदू रूढीपरंपरांनुसार सापाशी बिमबालाचे लग्न लागले. तिने विधिवत सप्तपदीही केली व त्याला आपला पती म्हणून स्वीकारले. गंमत म्हणजे ज्याच्याशी तिने लग्न केले तो साप लग्नात सहभागी नव्हता. त्याच्या जागी तांब्याचा साप बनवून सप्तपदी झाली. बिमबालाचे म्हणणे असे आहे की, ‘घराजवळील बिळातील सापाला मी जेव्हा दूध प्यायला द्यायची तेव्हा तो बाहेर येऊन ते प्यायचा. सापाला मीदेखील आवडते त्यामुळे त्याने कधी तिला चावण्याचा प्रयत्न केलेला नाही.’

Web Title: She got married to a snake