शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रोज २४ किमी सायकल चालवत जायची शाळेत, दहावीच्या परीक्षेत मिळवले ९८%

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 11:55 IST

मध्य प्रदेश शालेय शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता १० वीच्या परिक्षेचे निकाल शनिवारी जाहीर झाले आणि चंबळ खोºयातील भिंड जिल्ह्याच्या अजनोल गावातील १५ वर्षांची रोशनी सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली.

भिंड (मध्यप्रदेश) : रोज २४ किमी सायकल चालवत शाळेला जाऊन इयत्ता १० च्या बोर्डाच्या परिक्षेत ९८.७५ टक्के गुण मिळविणाऱ्या रोशनी भदोरिया या मध्य प्रदेशमधील जिद्दी मुलीचे सर्वदूर कौतुक होत आहे. यापुढेही असाच मन लावून अभ्यास करून ‘कलेक्टर’ होण्याची मनिषा रोशनी हिने व्यक्त केली आहे. मध्य प्रदेश शालेय शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता १० वीच्या परिक्षेचे निकाल शनिवारी जाहीर झाले आणि चंबळ खोºयातील भिंड जिल्ह्याच्या अजनोल गावातील १५ वर्षांची रोशनी सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली. एकूण ९८.७५ टक्के व गणित आणि विज्ञान या विषयांत पैकीच्या पैकी गुण मिळविणारी रोशनी संपूर्ण राज्याच्या गुणवत्ता यादीत आठवी आली. माध्यम प्रतिनिधी अवघ्या १२०० लोकवस्तीच्या या दुर्गम गावात पोहोचले तेव्हा शिक्षणाच्या ध्यासाने अपार कष्ट करण्याची तयारी असलेल्या रोशनीच्या जिद्दीने ते थक्क झाले. इयत्ता आठवीपर्यंत रोशनी गावाजवळच्याच शाळेत शिकली. परंतु पुढील शिक्षणासाठी तिला १२ किमी लांब असलेल्या मेहगाव येथील सरकारी मुलींच्या शाळेत प्रवेश घ्यावा लागला. अजनोलहून मेहगावला जायला अन्य कोणतेही प्रवासाचे साधन नसल्याने इयत्ता नववी व १०वीची दोन वर्षे ती दररोज सायकलने शालेत जायची व परत यायची. तिची रोजची सायकल रपेट २४ किमी व्हायची. एवढे दमून घरी आल्यावरही ती रोज सहा-सात तास अभ्यास करायची.रोशनी म्हणते की, अनेक वेळा पावसाळ््यात रात्री घरीही येता येत नसे. तेव्हा मी मेहगावलाच आमच्या एका परिेचितांच्या घरी राहून दुसºया दिवशी परत यायचे. आता मात्र मी रोशनीला शाळेत जाण्यासाठी दुसरी काही तरी प्रवासाची सोय करीन, असे तिचे वडील पुरुषोत्तम यांनी सांगितले. गावात अभ्यासात इतर कोणीच एवढी हुसारी दाखविली नसल्याने र्स गावाला आनंद झाल्याचे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)आई-वडिलांचे प्रोत्साहनस्वत: रोशनीच्या मेहनतीएवढात आई-वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनाचा तिच्या धवलयशात मोठा वाटा आहे. तिचे वडील पदवीधर आहेत व आई १२वीपर्यंत शिकलेली आहे. चार एकर कोरडवाहू शेती असल्याने आर्थिक परिस्थिती बेताची असूनही कितीही कष्ट पडले तरी तिन्ही मुलांना हवे तेवढे भरपूर शिकू देण्याचा दोन्ही पालकांचा पक्का निर्धार आहे. रोशनीचा एक भाऊ इयत्ता आठवी, तर दुसरा इयत्ता सहावीत शिकत आहे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीMadhya Pradeshमध्य प्रदेश