शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शत्रुघ्न सिन्हांच्या 'होम मिनिस्टर' देणार गृहमंत्र्यांना टक्कर; राजनाथ सिंहांविरोधात लढणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 17:46 IST

उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये यावेळच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री विरुद्ध शत्रुघ्न सिन्हा यांच्या होम मिनिस्टर अशी लढत रंगणार आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये यावेळच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री विरुद्ध शत्रुघ्न सिन्हा यांच्या होम मिनिस्टर अशी लढत रंगणार आहे. शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी . पूनम सिन्हा यांनी आज एसपी नेत्या डिंपल यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षात प्रवेश केला असून, समाजवादी पक्षाने त्यांना लखनौ येथून उमेदवारी जाहीर केली आहे. पूनम सिन्हा या १८ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजापचे खासदार असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना बिहारमधील पाटणा साहिब येथून लोकसभेची उमेदवारीही जाहीर झाली आहे. त्यानंतर पूनम सिन्हा या लखनौ येथून लोकसभा निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू झाली होती. अखेरीस पूनम सिन्हा यांनी आज समाजवादी पक्षात प्रवेश केला. तसेच त्यांना उमेदवारीही जाहीर झाली. दरम्यान, लखनौमध्ये भाजपाला पराभूत करणे शक्य व्हावे यासाठी काँग्रेसने या ठिकाणी उमेदवार देऊ नये, असे आवाहन समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते रविदास मेहरोत्रा यांनी केले आहे.   शत्रुघ्न सिन्हा हे काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याने काँग्रेसकडून पूनम सिन्हा यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. लखनौमध्ये सुमारे तीन ते साडेतीन लाख कायस्थ मतदार आहेत. तसेच सुमारे सव्वा लाख सिंधी मतदार आहेत. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांना लखनौ येथून उमेदवारी देण्यात यावी, असा सल्ला सपाच्या काही नेत्यांनी दिला होता. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि लखनौचे विद्यमान खासदार राजनाथ सिंह यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राजनाथ सिंह हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. पूनम सिन्हा यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता राजनाथ सिंह म्हणाले की, ''कुणीतरी विरोधात निवडणूक लढवलीच पाहिजे.  हेच आपल्या लोकशाहीचे सौंदर्य आहे.'' 

 

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019Samajwadi Partyसमाजवादी पार्टीRajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपाlucknow-pcलखनऊShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९