‘शास्त्रींच्या नियुक्तीमुळे संघात नवा उत्साह संचारेल’
By Admin | Updated: August 20, 2014 00:37 IST2014-08-20T00:37:17+5:302014-08-20T00:37:17+5:30
बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी माजी क्रिकेटपटू रवी शास्त्रीची भारतीय संघाच्या संचालकपदी नियुक्ती करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले

‘शास्त्रींच्या नियुक्तीमुळे संघात नवा उत्साह संचारेल’
नवी दिल्ली : बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी माजी क्रिकेटपटू रवी शास्त्रीची भारतीय संघाच्या संचालकपदी नियुक्ती करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असून, शास्त्रीच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियामध्ये नवा उत्साह संचारेल, अशी आशा व्यक्त केली.
पत्रकारांसोबत बोलताना पटेल म्हणाले, ‘रवी शास्त्रीच्या मार्गदर्शनाखाली संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरेल, असा मला विश्वास आहे. शास्त्री यांचा मैदान व मैदानाबाहेरील अनुभव राष्ट्रीय संघाची कामगिरी सुधारण्यास महत्त्वाचा ठरेल. गेल्या दोन आठवडय़ांपासून बीसीसीआयचे पदाधिकारी याबाबत चर्चा करीत आहेत. सोमवारी यावर सखोल चर्चा झाली आणि त्यानंतर शास्त्रीची संचालकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.’
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत 3-1 ने पराभव स्वीकारणा:या भारतीय संघाच्या ‘फ्लॉप शो’नंतर संघ व्यवस्थापनामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची झळ गोलंदाजी व क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांना बसली. दो दावेस व ट्रॅव्हर पेनी यांना कसोटी मालिका गमाविल्यानंतर आगामी पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेसाठी विश्रंती देण्यात आली. माजी क्रिकेटपटू संजय बांगर व भारत अरुण यांची सहप्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. (वृत्तसंस्था)