शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

शशिकला समर्थकांना मारहाण

By admin | Updated: December 29, 2016 00:41 IST

अण्णा द्रमुकच्या मुख्यालयात सरचिटणीसपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास गेलेल्या खासदार शशिकला पुष्पा गेल्या असता, अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे

चेन्नई : अण्णा द्रमुकच्या मुख्यालयात सरचिटणीसपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास गेलेल्या खासदार शशिकला पुष्पा गेल्या असता, अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे पती, वकील तसेच समर्थकांना बेदम मारहाण केली. अण्णा द्रमुकच्या जनरल कौन्सिलची बैठक उद्या, गुरुवारी होणार असून, त्यात नव्या सरचिटणीसांची निवड होणार आहे.तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूनंतर अण्णा द्रमुकमध्ये जोरदार गटबाजी सुरू झाली असून, खा. शशिकला पुष्पा यांच्या समर्थकांना मारहाण हा त्याचाच भाग आहे. खा. शशिकला पुष्पा यांना पक्षातून निलबित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना पक्षातील कोणत्याही पदासाठी अर्ज करण्याचा अधिकार नाही, असे मुख्यालयात जमलेल्या अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. याउलट आपण आजही पक्षाच्या जनरल कौन्सिलच्या सदस्य आहोत. त्यामुळे आपल्याला सरचिटणीसपदाच्या निवडणुकीत उभे राहण्याचा हक्क आहे, असे खा. जयललिता यांनी सांगितले.अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी खा. जयललिता पुष्पा यांचे पती, वकील व समर्थकांना इतकी मारहाण केली, त्यांच्यापैकी काही जण रक्तबंबाळच झाले. पोलिसांनी दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांना एकमेकांपासून दूर करण्याचा केलेला प्रयत्नही यशस्वी झाला नाही.खा. शशिकला पुष्पा यांनी राज्यसभेत काही महिन्यांपूर्वी पक्ष नेतृत्वाच्या विरोधात आवाज उठवला होता. आपल्या जीवाला पक्षाच्या नेत्यांपासून धोका असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्या भरात त्यांनी खासदारकीचा राजीनामाही देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर श्रीमती जयललिता यांनी त्यांना पक्षातून निलंबित केले होते. आपण आजही जनरल कौन्सिलच्या सदस्य आहोत, असे शशिकला पुष्पा यांचे म्हणणे आहे. जनरल कौन्सिलच्या बैठकीत शशिकला नटराजन यांची सरचिटणीसपदी निवड होणार, हे नक्की आहे. अशातच दुसऱ्या शशिकला यांनी अर्ज भरण्याचा प्रयत्न करणे, हे अण्णा द्रमुकमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे लक्षण मानले जात आहे. (वृत्तसंस्था)शशिकला विरुद्ध शशिकलाजनरल कौन्सिलच्या बैठकीलाही खा. शशीकला पुष्पा येण्याचा प्रयत्न करतील, अशी चिन्हे आहेत. पण बहुसंख्य नेते व कार्यकर्ते यांनी शशीकला नटराजन यांनाच सरचिटणीस करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे तामिळनाडूमध्ये सध्या शशीकला विरुद्ध शशीकला असेच चित्र निर्माण झाले आहे.