शशिकला यांचे अद्रमुकवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 09:39 AM2021-05-31T09:39:34+5:302021-05-31T09:39:54+5:30

राजकारणात परतण्याचे संकेत : पक्षाची वाताहात बघवत नाही

Shashikala's attempt to gain control over AIADMK | शशिकला यांचे अद्रमुकवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न

शशिकला यांचे अद्रमुकवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न

googlenewsNext

चेन्नई : वर्षभरापूर्वी अद्रमूकमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या व्ही. के. शशिकला यांनी अद्रमूक पक्षावर पुन्हा ताबा मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले असून, यातून त्या पुन्हा राजकारणात परतण्याचे संकेत मिळतात. अंतर्गत भांडणामुळे पक्षाची होणारी वाताहात मी पाहू शकत नाही. लवकर चांगला निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी आपल्या समर्थकांना सांगितले.

दिवगंत जे. जयललिता यांच्या अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू राहिलेल्या शशिकला यांनी आपल्या दोन निष्ठावंत नेत्यांशी फोनवरून केलेले संभाषण जाहीर झाले आहे. यातून त्या पुन्हा राजकारणात परतणार असल्याचे संकेत मिळतात. या संभाषणाच्या पहिल्या ध्वनिफितीत ‘आम्ही निश्चितच पक्षाची घडी नीट बसवू, याची खात्री आहे. मी येत आहे’, असे म्हणत असल्याचे ऐकू येते. दुसऱ्या ध्वनिफितीत त्या अद्रमूकच्या संदर्भाने आपल्या समर्थकांना म्हणतात की, पक्ष उभारणीसाठी माझ्या पक्ष नेत्यांनी खूप मेहनत घेतली. नेत्यांतील पक्षांतर्गत कलह पाहून मी दु:खी आहे. पक्षाची वाताहात होताना मी निमूट राहू शकत नाही.

कोरोना साथीची दुसरी लाट कमी झाल्यानंतर मी येईन आणि समर्थकांना भेटणार आहे. पक्ष पुन्हा चांगल्या स्थितीत आणला जाऊ शकतो. त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. लवकरच चांगला निर्णय होईल आणि मी पुन्हा परत येईन, असे त्या म्हणत असल्याचे ध्वनिफितीत ऐकू येते. यातून शशिकला यांनी अद्रमूकवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे संकेत मिळतात. यावर अद्रमूकचे प्रवक्ते आणि पक्षाच्या कायदा समितीचे प्रदेश सह-सचिव आर. एम. बाबू मुरुगवेल म्हणाले की, त्यांच्या टिप्पणीशी आमचे काहीही देणे-घेणे नाही.
 

Web Title: Shashikala's attempt to gain control over AIADMK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.