शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

शशिकला यांना पाच दिवसांचा पॅरोल मंजूर, आजारी पतीला भेटण्यासाठी मिळाला पॅरोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 1:17 PM

भ्रष्टाचाराच्या खटल्यात कारावासाची शिक्षा झाल्याने सध्या तुरुंगात असलेल्या अण्णा द्रमुकच्या नेत्या व्ही. के. शशिकला यांना पॅरोल मंजूर झाला आहे.

ठळक मुद्देशशिकला यांचे पती एम. नटराजन यांच्यावर  नुकतीच अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियासध्या तुरुंगात असलेल्या अण्णा द्रमुकच्या नेत्या व्ही. के. शशिकला यांना पॅरोल मंजूर आजारी पतीला भेटण्यासाठी शशिकला यांना पाच दिवसांचा आपातकालीन पॅरोलफेब्रुवारी महिन्यापासून शशिकला कारावासात

बंगळुरू - भ्रष्टाचाराच्या खटल्यात कारावासाची शिक्षा झाल्याने सध्या तुरुंगात असलेल्या अण्णा द्रमुकच्या नेत्या व्ही. के. शशिकला यांना पॅरोल मंजूर झाला आहे. आजारी पतीला भेटण्यासाठी शशिकला यांना पाच दिवसांचा आपातकालीन पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. शशिकला यांचे पती एम. नटराजन यांच्यावर  नुकतीच अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. 

आजारी पतीला भेटण्यासाठी शशिकला यांनी गुरुवारी पॅरोल मंजुरीसाठी अर्ज केला होता. तसेच त्यासोबत आपल्या आजारी पतीची सर्व वैद्यकिय प्रमाणपत्रे जोडली होती. त्याआधीही 3 ऑक्टोबर रोजी शशिकला यांनी पॅरोलसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र तो अर्ज अपुऱ्या कागदपत्रांचा हवाला देत फेटाळून लावण्यात आला होता. शशिकला यांचे पती एम. नटराजन यांच्यावर मंगळवारी मुत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपनाची जटील शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया सुमारे साडेसात तास चालली होती. 

बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी विशेष न्यायालयाने सुनावलेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने शशिकला यांना तुरुंगात जावे लागले होते. यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापासून त्या कारावास भोगत आहेत. शशिकला यांच्याबरोबरच त्यांचे नातेवाईक इलावरसी आणि व्ही.एन. सुधाकरन यांना सुद्धा चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे.   भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तुरुंगात असलेल्या एआयएडीएमकेच्या सरचिटणीस शशिकला यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप याआधी झाला होता.  . शशिकला यांचे तुरूंगातील सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यानंतर शशिकला यांना तुरूंगात व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचे बोलले जात होते. शशिकला यांना तुरुंगातील नियम लागू नसल्याचाही आरोप झाला होता. काही महिन्यांपूर्वी समोर आलेल्या बंगळुरुच्या मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळील सीसीटीव्ही चित्रिकरणात साध्या वेषातील शशिकला तुरूंगाबाहेरून आतमध्ये येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी तुरुं गाच्या प्रवेशद्वारावर अनेक सुरक्षारक्षक तैनात होते. मात्र, तरीही शशिकला आरामात तुरूंगाच्या आतमध्ये प्रवेश करताना दिसत होत्या.

 

 
टॅग्स :V. K. Shashikalaव्ही. के. शशिकलाTamilnaduतामिळनाडू