शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस युक्त भाजपा! 'छोड़कर जा रहे हैं घर अपना...', आरपीएन सिंह यांच्यावरून शशी थरूरांचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 12:23 IST

Shashi Tharoor : शशी थरूर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आता भाजप काँग्रेससारखा दिसत आहे, कारण भाजपमध्ये अनेक नेते सामील झाले आहेत. 

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंग यांच्यावर काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केल्याबद्दल निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करून भाजपाच्या 'काँग्रेस-मुक्त भारत'ला प्रत्युत्तर म्हणून 'कांग्रेस युक्त भाजपा' असा टोला हाणला आहे. शशी थरूर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आता भाजपा काँग्रेससारखा दिसत आहे, कारण भाजपामध्ये अनेक नेते सामील झाले आहेत. 

शशी थरूर यांचे ट्विट...'छोड़कर जा रहे हैं घर अपनाशायद उनके कुछ और सपने हैंअब उधर भी सब अपना सा हैअब उधर भी तो सभी अपने हैं'(कांग्रेस युक्त भाजपा!)

दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का देत आरपीएन सिंह यांनी मंगळवारी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही तासांनी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा ट्विटरवर शेअर करत त्यांनी आपल्या राजकीय प्रवासात एक नवीन अध्याय सुरू करत असल्याची घोषणा केली.

आरपीएन सिंह हे काँग्रेसचे झारखंड राज्य प्रभारी होते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने त्यांची स्टार प्रचारक म्हणूनही नियुक्ती केली होती. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा कमळ फुलवण्याच्या इराद्याने पक्षात प्रवेश केल्यानंतर आरपीएन सिंह भाजप मुख्यालयात पत्रकार परिषदेत म्हणाले, 'काँग्रेस आता पूर्वीसारखी राहिलेली नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कार्यकर्ता म्हणून काम करेन. मी तात्काळ प्रभावाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोडत आहे. मला देश, जनता आणि पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.'

आरपीएन सिंह यांच्याआधी ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधिया, जितिन प्रसाद, रायबरेलीच्या आमदार आदिती सिंह यांनीही काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील पडरौना मतदारसंघातून आरपीएन सिंह यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नुकतेच भाजपा सोडून समाजवादी पार्टीमध्ये दाखल झालेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांना भाजपा कडवे आव्हान देऊ शकते, असे मानले जात आहे.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा