"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 10:56 IST2025-05-25T10:48:41+5:302025-05-25T10:56:31+5:30

काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर असून, त्यांनी न्यू यॉर्क येथील भारतीय दूतावासात आयोजित कार्यक्रमात पाकिस्तानला सुनावले.

Shashi Tharoor visits 9/11 memorial in US, says Pakistan's terrorism ‘not acceptable to us’ | "जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!

"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे समोर आल्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती मोहिम सुरू केली आहे. याच उद्देशाने भारत सरकारने ७ शिष्टमंडळांची नियुक्ती केली असून, ५१ राजकीय नेते आणि ८५ राजदूत ३२ देशांमध्ये भेटी देत आहेत. यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असून, जागतिक समुदायासमोर भारताची भूमिका स्पष्ट करण्यात येत आहे.

अमेरिकेत शशी थरूर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ
काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर असून, त्यांनी न्यू यॉर्क येथील भारतीय दूतावासात आयोजित कार्यक्रमात भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती जगासमोर मांडली. यावेळी त्यांनी दहशतवादाविरोधात जागतिक एकतेचे आवाहन केले.

पहलगाम हल्ल्याचा उद्देश सामाजिक सलोखा बिघडवणे!
शशी थरूर म्हणाले की, "पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा उद्देश भारतातील हिंदू-मुस्लिम ऐक्य बिघडवणे हा होता. हा हल्ला केवळ भारतावर नव्हे, तर सामाजिक एकतेवरही घात होता. हे यापुढे अजिबात सहन केले जाणार नाही."

९/११ स्मारकाला दिली भेट 
या शिष्टमंडळाने ९/११ च्या स्मारकाला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी थरूर म्हणाले की, "२० वर्षांपूर्वी न्यू यॉर्कला दहशतवादाचा जबरदस्त फटका बसला होता. भारतालाही आता त्याचं भयावह रूप अनुभवावं लागलं आहे. आम्ही येथे आलो आहोत, कारण दहशतवाद ही केवळ एका देशाची समस्या नाही, तर संपूर्ण जगाची आहे."

पक्षीय सीमांना पार करणारे शिष्टमंडळ
या शिष्टमंडळात काँग्रेसचे शशी थरूर यांच्यासोबत भाजपचे शशांक मणी त्रिपाठी, भुवनेश्वर कलिता आणि तेजस्वी सूर्या, एलजेपीच्या शांभवी चौधरी, टीडीपीचे जीएम हरीश बालयोगी, शिवसेनेचे मिलिंद देवरा आणि झारखंड मुक्ति मोर्चाचे माजी आमदार सर्फराज सिंह यांचा समावेश आहे.

Web Title: Shashi Tharoor visits 9/11 memorial in US, says Pakistan's terrorism ‘not acceptable to us’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.