शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

शशी थरुर यांच्याकडून इम्रान खान यांचं कौतुक; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 2:55 PM

ट्विट करुन इम्रान खान यांची स्तुती

नवी दिल्ली: टिपू सुलतानच्या पुण्यतिथीनिमित्त त्याचं स्मरण करणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं काँग्रेस नेते शशी थरुर यांनी कौतुक केलं. 4 मे रोजी टिपू सुलतानची पुण्यतिथी होती. त्या निमित्तानं इम्रान खान यांनी ट्विट करुन त्याची स्तुती केली होती. याबद्दल थरुर यांनी इम्रान खान यांचं ट्विट करुन प्रशंसा केली. मी खान यांना वैयक्तिकरित्या ओळखतो. त्यांना भारतीय उपखंडाच्या इतिहासात खरंच रस आहे, असं थरुर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. इम्रान खान यांनी 4 मे रोजी एक ट्विट केलं होतं. 'आज 4 मे. टिपू सुलतान यांची पुण्यतिथी. या माणसाचं मला नेहमी कौतुक वाटतं. कारण गुलामांसारखं जगण्याऐवजी त्यांनी स्वतंत्र्याची निवड केली. त्यासाठी ते लढले आणि लढता लढता त्यांनी मरण पत्करलं,' असं खान यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. याबद्दल शशी थरुर यांनी आज खान यांचं कौतुक केलं. 'इम्रान खान भारतीय उपखंडाच्या इतिहासाचं वाचन करतात. त्यांना या भागाची चिंता आहे,' असं थरुर यांनी ट्विटमध्ये म्हटलं.'महान भारतीय नायका'ची आठवण पाकिस्तानातल्या नेत्यांना येते हे दु:खदायक असल्याचं म्हणत थरुर यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींना टोला लगावला. इम्रान खान याआधीही टिपू सुलतानचं कौतुक केलं होतं. फेब्रुवारीत पुलवामात दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर भारत-पाकिस्तानमधले संबंध ताणले गेले होते. त्यावेळी संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत खान यांनी टिपू सुलतानाचा उल्लेख केला होता. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरImran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान