शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Sunanda Pushka Murder Case: सुनंदा पुष्कर प्रकरणात शशी थरूर यांना मिळाला अटकपूर्व जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 12:22 IST

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात दिल्लीतल्या पटियाळा हाऊस कोर्टानं काँग्रेस नेते शशी थरूर यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

नवी दिल्ली- सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात दिल्लीतल्या पटियाळा हाऊस कोर्टानं काँग्रेस नेते शशी थरूर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. थरूरला 1 लाख रुपयांच्या बेल बाँडवर हा जामीन देण्यात आला आहे. परंतु शशी थरूर न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेरही जाऊ शकत नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश अरविंद कुमार यांनी दोन्ही बाजूंकडचा युक्तिवाद ऐकला आणि निर्णय राखून ठेवला होता. अखेर त्यावर आज सुनावणी झाली. थरूर यांच्याकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, शशी थरूर एक खासदार आहेत आणि या प्रकरणात त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळायलाच हवा. थरूर यांच्याविरोधात चार्जशीट दाखल झाली आहे. एसआयटीनंही चौकशी पूर्ण केलेली आहे. न्यायालयानं 5 जूनला थरूर यांना समन्स बजावून सात जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं होतं. शशी थरूर यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्यानं त्यांच्याविरोधात कारवाई करता येऊ शकते, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. 

वकील विकास पाहवा यांच्यामार्फत दाखल केलेल्या आपल्या या अर्जात थरूर म्हणाले होते की, अटक न करताच आरोपपत्र दाखल करण्यात आले असून एसआयटीने म्हटले आहे की तपास संपला असून कोठडीतील चौकशीची गरज नाही. अटक न करता आरोपपत्र दाखल केले गेल्यास जामीन अटळ आहे, असे कायदा म्हणतो. त्यामुळे आम्ही संरक्षणासाठी विनंती केली आहे म्हणजे आम्हाला 7 जुलै रोजी न्यायालयात हजर राहता येईल, असे थरूर यांच्यातर्फे सांगण्यात आले होते.

टॅग्स :Sunanda Pushkarसुनंदा पुष्करShashi Thaoorशशी थरुरCourtन्यायालयcongressकाँग्रेसCrimeगुन्हाMurderखून