Shashi Tharoor: काँग्रेस खासदार शशी थरुर आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत आणि टीकेचे धनी ठरतात. आता त्यांनी लोकशाहीच्या मूल्यांवर भर देत एक पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, 'निवडणुका विचारांसाठी जोमाने लढल्या पाहिजेत, परंतु जनतेच्या निर्णयानंतर, राष्ट्रीय हितासाठी सहकार्य दिले पाहिजे.' थरुर यांनी अमेरिकन मॉडेलचा उल्लेख केला आणि भारतात असे सहकार्य पाहण्याची इच्छा व्यक्त केली.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी शशी थरुर यांना पंतप्रधान मोदींचे कौतुक केल्यामुळे काँग्रेस नेत्यांकडून टीकेचा सामना करावा लागला होता.
थरुर यांच्या पोस्टमध्ये काय आहे?
आपल्या पोस्टसोबत थरुर यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी यांचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “लोकशाहीत असेच काम करायला हवे. निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने आपली भूमिका मांडावी, पण निकालानंतर राष्ट्राच्या हितासाठी एकत्र काम करायला शिकले पाहिजे. भारतातही ही भावना अधिक दिसावी आणि मी त्यासाठी माझे योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे.”
दरम्यान, थरुर यांच्या या पोस्टनंतर ही त्यांच्या स्वतःच्या पक्षालाच उद्देशून आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय.
अनेकदा पक्षविरोधीत वक्तव्ये
शशी थरुर गेल्या काही काळापासून अनेकदा पक्षाच्या भूमिकेविरोधात वक्तव्ये करत आहेत. काही प्रसंगी तर त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींचेही कौतुक केले आहे. मात्र, प्रत्येकवेली काँग्रेसने थरुर यांच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर ठेवले आहे.
Web Summary : Shashi Tharoor's post emphasizing democratic values and cooperation after elections sparks debate. He referenced the American model and expressed hope for similar collaboration in India. This follows past instances where Tharoor's statements differed from the Congress party line, drawing criticism.
Web Summary : शशि थरूर के एक पोस्ट ने लोकतांत्रिक मूल्यों और चुनावों के बाद सहयोग पर जोर दिया, जिससे बहस छिड़ गई। उन्होंने अमेरिकी मॉडल का हवाला दिया और भारत में इसी तरह के सहयोग की उम्मीद जताई। यह उन पिछली घटनाओं के बाद आया है जहां थरूर के बयान कांग्रेस पार्टी लाइन से अलग थे, जिससे आलोचना हुई।