राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 15:56 IST2025-12-12T15:49:58+5:302025-12-12T15:56:57+5:30

Sashi Tharoor News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील खासदार शशी थरूर यांच्या राजकीय भूमिकेबाबत गेल्या काही काळापासून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, शशी थरूर हे आज राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेसच्या लोकसभा खासदारांच्या बैठकीला अनुपस्थित राहिले.

Shashi Tharoor absent from meeting with Rahul Gandhi, sparks debate | राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 

राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील खासदार शशी थरूर यांच्या राजकीय भूमिकेबाबत गेल्या काही काळापासून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, शशी थरूर हे आज राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेसच्या लोकसभा खासदारांच्या बैठकीला अनुपस्थित राहिले. थरूर यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र या बैठकीला अनुपस्थित राहण्याबाबत शशी थरूर यांनी पूर्वकल्पना दिली होती असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या बैठकीला काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते आणि चंडीगडचे खासदार मनीष तिवारी हेसुद्धा अनुपस्थित होते. 

शशी थरूर हे काल रात्री कोलकाता येथे प्रभात खेतान फाऊंडेशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते, असे त्यांच्या एक्सवरील टाईमलाईनमधून दिसत आहे. मात्र शशी थरूर हे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकांना वारंवार अनुपस्थित राहत असल्याचे दिसून येत आहे.  याआधी काही दिवसांपूर्वी शशी थरूर काँग्रेसच्या एका धोरणात्मक बैठकीला दांडी मारली होती. मात्र मी या बैठकीला जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिलो नव्हतो, तर त्यावेळी मी केरळमधून येणाऱ्या विमानात होतो, असे शशी थरूर यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या त्या बैठकीला शशी थरूर हे अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं गेलं होतं. त्याआधी एसआयआरच्या मुद्द्यावर झालेल्या काँग्रेसच्या बैठकीलाही शशी थरूर यांना प्रकृती अस्वस्थ्याचा हवाला देत दांडी मारली होती.  
 

Web Title : राहुल गांधी की बैठक से शशि थरूर गायब, अटकलें तेज।

Web Summary : राहुल गांधी की बैठक से शशि थरूर की अनुपस्थिति से राजनीतिक चर्चा शुरू हो गई। पूर्व प्रतिबद्धताओं का हवाला देते हुए, मनीष तिवारी के साथ उनकी अनुपस्थिति ने पार्टी के स्पष्टीकरण के बावजूद अटकलों को हवा दी। कांग्रेस की महत्वपूर्ण बैठकों से थरूर की पिछली अनुपस्थितियों ने भी ध्यान आकर्षित किया है, जिससे उनके राजनीतिक रुख पर सवाल उठ रहे हैं।

Web Title : Shashi Tharoor absent from Rahul Gandhi meeting, speculations rise.

Web Summary : Shashi Tharoor's absence from Rahul Gandhi's meeting sparks political buzz. Citing prior commitments, his absence, alongside Manish Tewari's, fuels speculation despite party clarification. Tharoor's previous absences from key Congress meetings have also drawn attention, raising questions about his political stance.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.