भारताशी संबंध चांगले नसल्याबद्दल शरीफ यांना खेद
By Admin | Updated: August 10, 2014 03:08 IST2014-08-10T03:08:04+5:302014-08-10T03:08:04+5:30
पाकिस्तानचे आपला प्रमुख शेजारी देश भारतासोबत खराब संबंध असल्याबद्दल पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शनिवारी येथे जाहीर खेद व्यक्त केला.

भारताशी संबंध चांगले नसल्याबद्दल शरीफ यांना खेद
>इस्लामाबाद : पाकिस्तानचे आपला प्रमुख शेजारी देश भारतासोबत खराब संबंध असल्याबद्दल पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शनिवारी येथे जाहीर खेद व्यक्त केला. आता भारतासोबत चांगले संबंध निर्माण करण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय सुरक्षा संमेलनाला संबोधित करताना ते बोलत होते. आपल्या देशाचे शेजारी देशांशी चांगले संबंध नसल्याचे शरीफ यांनी यावेळी सखेद नमूद केले. या संमेलनात मंत्री, मुख्यमंत्री, सर्व प्रमुख पक्षांचे नेते, लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ व आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल झहीरुल इस्लाम यांच्यासह इतर वरिष्ठ लष्करी व मुलकी अधिकारी उपस्थित होते. भारताचा उल्लेख करताना शरीफ म्हणाले, या शेजा:याशी चांगले संबंध निर्माण करण्याची वेळ आली आहे. उभय देशांच्या परराष्ट्र सचिवांची आगामी बैठक हे संबंध पुढे नेण्यास उपयोगी ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आपला देश अफगाणिस्तानशी संबंध सुधारूइच्छितो, असे सांगून तेथील नवे नेतृत्व आपल्याला सहकार्य करील, अशी आपणास आशा असल्याचेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)