येत्या रविवारपासून शरणपूररोड वाहतुकीसाठी बंद
By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:17+5:302015-08-27T23:45:17+5:30
तिसरा श्रावणी सोमवार : मेळा स्थानक-ठक्कर बाजार रस्त्यावर एकेरी वाहतूक

येत्या रविवारपासून शरणपूररोड वाहतुकीसाठी बंद
त सरा श्रावणी सोमवार : मेळा स्थानक-ठक्कर बाजार रस्त्यावर एकेरी वाहतूकनाशिक : तिसर्या श्रावणी सोमवारनिमित्त मेळा बसस्थानकातून त्र्यंबके श्वर येथे मोठ्या संख्येने भाविक रवाना होतात. यामुळे मेळा स्थानकाच्या परिसरात प्रचंड गर्दी होत असते. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळू नये व वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने रविवारी दुपारी २ वाजेपासून सीबीएस ते टिळकवाडी सिग्नलपर्यंत शरणपूररोड वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.मेळा बसस्थानकावरून त्र्यंबकेश्वरकडे महामंडळामार्फत जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे ब्रागिरीच्या फेरीसाठी व त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी जाणार्या भाविकांची गर्दी लक्षात घेता मेळा स्थानकाच्या आवारात वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ म्हणून सीबीएसपासून थेट टिळकवाडी सिग्नलपर्यंतचा रस्ता शहर बस वाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून अन्य सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे. रविवारी दुपारी २ वाजेपासून या वाहतूक नियंत्रण अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पोलीस उपआयुक्त विजय पाटील यांनी अधिसूचनेत म्हटले आहे. या नियमाची अंमलबजावणी सोमवारी रात्री ८ वाजेपर्यंत केली जाणार असून, नागरिक ांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. सीबीएसवरून शरणपूररोडमार्गे कॅनडा कॉर्नरकडे जाणारी वाहतूक मोडक सिग्नल हॉली क्रॉस चर्चपासून जिल्हा रुग्णालयामार्गे त्र्यंबकरोडने वळविण्यात येणार आहे. तसेच मुंबईनाक्याकडून येणारी वाहने सीबीएसवरून डाव्या बाजूने वळण घेत शरणपूररोडने न जाता थेट अशोकस्तंभावरून गंगापूररोडने पुढे जातील, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सीबीएसकडे जाणारी वाहतूक टिळकवाडी सिग्नलवरून जलतरण तलाव सिग्नल व पंडित कॉलनीमार्गे वळविण्यात येणार आहे. ठक्कर बाजार ते मेळा स्थानकापर्यंतचा रस्त्यावरून दुहेरी वाहतूक बंद करण्यात येणार असून, एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. एकूणच या रस्त्यावरून केवळ महामंडळाच्या बसेस धावणार आहेत.