शरद यादव यांनी वसुंधरा राजेंची मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 12:09 PM2018-12-09T12:09:51+5:302018-12-09T12:16:45+5:30

जनता दल संयुक्तचे माजी नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची माफी मागितली आहे.

Sharad Yadav says sorry for ‘fat’ remark on Vasundhara Raje | शरद यादव यांनी वसुंधरा राजेंची मागितली माफी

शरद यादव यांनी वसुंधरा राजेंची मागितली माफी

googlenewsNext
ठळक मुद्देजनता दल संयुक्तचे माजी नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची माफी मागितली आहे. 'वसुंधरा राजे यांच्यासोबत जुने कौटुंबिक संबंध आहेत. माझ्या शब्दांमुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो'शरद यादव यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते.

जयपूर - जनता दल संयुक्तचे माजी नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची माफी मागितली आहे. 'वसुंधरा राजे यांच्यासोबत जुने कौटुंबिक संबंध आहेत. माझ्या शब्दांमुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो, याबाबत मी त्यांना एक पत्र देखील लिहिणार आहे' असे लोकशाही जनता दलाचे प्रमुख शरद यादव यांनी म्हटले आहे.

शरद यादव यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. 'राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे जाड झाल्या आहेत आणि त्यांना आता आराम द्यायला हवा', असे विधान राजस्थानच्या अलवर येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद यादव यांनी केले होते. दरम्यान, वसुंधरा राजे मध्य प्रदेशची कन्या असल्याचेही वक्तव्य त्यांनी केले होते.  शरद यादव यांचे हे आक्षेपार्ह विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले. तसेच याप्रकरणी त्यांच्याविरोधात सर्व स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.  



यादव यांच्या या विधानावर वसुंधरा राजेंनी चोख प्रत्युत्तर दिले होते. 'शरद यादव यांच्या विधानामुळे मी स्तब्ध झाले आहे. एवढा मोठा नेता आपल्या जीभेवर संयम ठेऊ शकत नाही, तर त्याचे वाईट वाटते. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी. त्यांच्या विधानामुळे माझा अपमान झाला आहे. खरंतर हा महिलावर्गाचा अपमान आहे' असं वसुंधरा राजेंनी म्हटलं होतं. 

 

Web Title: Sharad Yadav says sorry for ‘fat’ remark on Vasundhara Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.