शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांची तात्काळ सुटका करा, पवारांचे सरकारला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 4:49 PM

शरद पवार यांनी एक पत्रक जारी करुन जॉईंट स्टेटमेंट देत असल्याचं म्हटलयं. त्यामध्ये, प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी,

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जॉईंट स्टेटमेंट जारी केलंय. त्यामध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकारने स्थानबद्ध केलेल्या नेत्यांची सुटका करण्याची मागणी मोदी सरकारकडे केली आहे. जम्मू आणि काश्मीरचे तीन माजी मुख्यमंत्री आणि राजकीय नेत्यांची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी पवार यांनी या पत्राद्वारे केली आहे. या मागणीला प.बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनीही समर्थन दिलंय. 

शरद पवार यांनी एक पत्रक जारी करुन जॉईंट स्टेटमेंट देत असल्याचं म्हटलयं. त्यामध्ये, प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, कम्युनिष्ट पक्षाचे नेते सिताराम येचुरी, सीपीआयचे डी. राजा, राज्यसभा खासदार मनोजकुमार झा, माजी मंत्री यशवंत सिन्हा, माजी मंत्री अरुण शौरी यांचे समर्थन आणि या सर्वांचे एकमत असल्याचे म्हटले आहे. विविधतेते एकता असलेला भारत देश असून देशाची राज्यघटना यावरच उभारली आहे. समता, बंधुता आणि अंखडता ही आपल्या संविधानाची मुल्ये आहेत. प्रत्येक नागरिकाला घटनेनं स्वतंत्र आणि मुक्तपणे जगण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे, मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थानबद्ध केलेल्या तीन माजी मुख्यमंत्र्यांची सुटका करावी, अशी मागणी या जाँईंट स्टेटद्वारे केली आहे. 

शरद पवार यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटवरुन हे जॉईंट स्टेटमेंट जारी केले आहे. त्यामध्ये, जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांची तात्काळ सुटका करावी, असे म्हटले आहे. तसेच, काश्मीरमध्ये स्थानबद्ध केलेल्या राजकीय नेत्यांची सुटका करा, असेही त्यात म्हटले आहे.  

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 ला मंजुरी मिळताच काश्मीर खोऱ्यात मोठी कारवाई करण्यात आली. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना अटक करण्यात आली. तसेच महेबूबा मुफ्ती यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. सध्या, मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला आणि फारूक अब्दुल्ला यांना सरकारने स्थानबद्ध केलं आहे. कलम 370 रद्द करणे आणि काश्मीरच्या विभाजनाला राज्यसभेची मंजुरी मिळाल्यानंतर कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMumbaiमुंबईSharad Pawarशरद पवार