शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar: शरद पवार-अमित शहा भेटीचा खुलासा, जाणून घ्या कशावर झडली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 19:07 IST

Sharad Pawar: अमित शहा-शरद पवार यांच्या भेटीनं अनेक चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अमित शहांसोबत झाली.

ठळक मुद्देआम्ही निदर्शनास आणून दिलेल्या अडचणींचा सहकारमंत्री विचार करतील आणि त्या सोडवतील, अशी आशाही शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच, या बैठकीत सहकारमंत्र्यांना देण्यात आलेले पत्रही त्यांनी ट्विटरवरुन शेअर केले आहे

नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एकीकडे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विरोधी पक्षाला एकत्रित आणण्यासाठी ब्रेकफास्ट डिप्लोमासीचा अवलंब केला आहे. मोदी सरकार घेरण्यासाठी काँग्रेससह १४ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) आणि केंद्रीय गृहमंत्रीअमित शहा(Amit Shah) यांची भेट घेतली. त्यामुळे, राज्याच्या राजकारणात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. मात्र, स्वत: शरद पवार यांनीच या भेटीचा खुलासा केला आहे. 

अमित शहा-शरद पवार यांच्या भेटीनं अनेक चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अमित शहांसोबत भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये केवळ सहकार क्षेत्रावरच चर्चा होणार की पडद्यामागून अन्य काही राजकीय डाव साधला जाणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शहा-पवार भेटीत नेमकं काय घडलं आणि त्याचा भविष्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे सांगणं आत्ता कठीण आहे. मात्र, स्वत: शरद पवार यांनीच भेटीचं स्पष्टीकरण दिलंय.सुरुवातीला मी देशाचे पहिले सहकारमंत्री नियुक्त झाल्याबद्दल केंद्रीयमंत्री अमित शहांचे अभिनंदन केले. त्यानंतर, या बैठकीत साखर उत्पादनासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा झाली. देशातील सद्यस्थिती आणि जास्त साखर उत्पादनामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवरही चर्चा झाली. साखरेचा एमएसपी आणि साखर कारखान्यांच्या आवारात इथेनॉल उत्पादन युनिट उभारण्यासाठी परवानगी, यांसारख्या दोन गंभीर समस्याही आम्ही नव्या सहकारमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.  आम्ही निदर्शनास आणून दिलेल्या अडचणींचा सहकारमंत्री विचार करतील आणि त्या सोडवतील, अशी आशाही शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच, या बैठकीत सहकारमंत्र्यांना देण्यात आलेले पत्रही त्यांनी ट्विटरवरुन शेअर केले आहे. या बैठकीला, सहकारी जयप्रकाश दांडेगावकर NFCSF (नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड) चे अध्यक्ष आणि साखर सहकारी संघाचे प्रकाश नाईकनवरे व खासदार सुनिल तटकरे हेही उपस्थित होते.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAmit Shahअमित शहाSugar factoryसाखर कारखानेdelhiदिल्लीministerमंत्री