Sharad Pawar meets Prime Minister Modi | शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट
शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट

नवी दिल्ली : अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनाअट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होण्याबाबत संदिग्धता असतानाच पवार यांच्या मोदी भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

पवार यांच्या भेटीनंतर लगेचच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मोदी यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाणच आले. राज्यात सरकार स्थापनेबाबत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये चर्चेचे गुºहाळ सुरूच असून, त्यातून काही निष्पन्न झालेले नाही. या पार्श्वभूमीवर पवार-मोदी यांच्या ५० मिनिटांच्या भेटीत काय चर्चा झाली याची सर्वांनाच उत्सुकता होती. भेटीनंतर महाराष्ट्रात सरकार स्थापनेबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यास पवार यांनी नकार दिला. नंतर त्यांनी ट्विटद्वारे पंतप्रधानांकडे केलेल्या मागण्यांचा उल्लेख केला.

दिले तीन पानी पत्र
शरद पवार यांनी तीन पानी पत्रात शेतकºयांना तात्काळ सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. खासगी वित्त संस्था व सरकारकडून शेतकºयांना बिनव्याजी कर्ज द्यावे. राज्यपालांनी जाहीर केलेली आर्थिक मदत अत्यंत कमी असल्याने त्यात वाढ व्हावी. मी कृषी मंत्री असताना शेतकºयांना प्रतिहेक्टर ३० हजारांची मदत केली होती. किमान तेवढी मदत आताही मिळावी, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

Web Title: Sharad Pawar meets Prime Minister Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.