शरद पवार-मायावती भेटीची चर्चा

By Admin | Updated: June 19, 2014 03:10 IST2014-06-19T03:10:16+5:302014-06-19T03:10:16+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाज पार्टी प्रमुख मायावती यांची बुधवारी भेट घेतल्याचे वृत्त आहे.

Sharad Pawar-Mayawati meeting discussions | शरद पवार-मायावती भेटीची चर्चा

शरद पवार-मायावती भेटीची चर्चा

फराज अहमद, नवी दिल्ली
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाज पार्टी प्रमुख मायावती यांची बुधवारी भेट घेतल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी भेट झाल्याचे मान्य केले, परंतु यातील चर्चेबद्दल माहिती नसल्याचे सांगितले.
वर्षअखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होत असल्याने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी राष्ट्रवादीला तीन आणि काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत.
सन २००९च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय रिपब्लिकन पार्टीचे (आरपीआय) नेते रामदास आठवले हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतून बाहेर पडले. तेव्हापासून आघाडीकडे दलित मते खेचणारा दलित नेता आघाडीकडे नाही, अशी स्थिती आहे. मायावती यांची राष्ट्रीय नेत्या म्हणून प्रतिमा असली तरी महाराष्ट्रात त्या प्रभावी मानल्या जात नाहीत. शिवाय सार्वत्रिक निवडणुकीत स्वत:च्या उत्तर प्रदेशात दारुण पराभव झाल्याने मायावती बॅकफूटवर आहेत. यामुळे शरद पवार बसपाशी आघाडी करण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पवार यांनी मायावतींना आघाडीत घेण्याविषयी काँग्रेसला विश्वासात घेतल्याचे संकेत नाहीत.

Web Title: Sharad Pawar-Mayawati meeting discussions