शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

बिनकामी माणसंच सरकार पाडण्याचा विचार करू शकतात,शरद पवार फडणवीसांवर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 21:49 IST

राज्य ज्या कठीण परिस्थितीतून जात आहे. अशा काळात ज्यांच्याकडे काही काम नाही तेच सरकार पाडण्याचा विचार करू शकतात. 

नवी दिल्लीः देशात कोरोनाचं भयंकर संकट असून, अनेक राज्यांना त्याचा फटका बसला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या ठाकरे सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे. तर दुसरीकडे विरोधक याच गोष्टीचा फायदा घेत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करत आहेत. विशेष म्हणजे अशा घडामोडी घडत असतानाच शरद पवारांनी पहिल्यांदा राज्यपाल आणि नंतर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत फडणवीसांनी निदर्शनंही केली होती. त्याला सीएनएन न्यूज 18 शी खास बातचीत करताना खुद्द शरद पवारांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. राज्य कठीण परिस्थितीतून जात आहे. अशा काळात ज्यांच्याकडे काही काम नाही तेच सरकार पाडण्याचा विचार करू शकतात. आम्ही कोरोना संक्रमणावर कसं नियंत्रण मिळवता येईल, त्यासाठी कोणते प्रयत्न करावे लागतील, यावर सातत्याने चर्चा करीत आहोत. अशा काळात देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा पक्ष राज्यात भाजपाचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, याचे मला आश्चर्यच वाटले. राज्यासाठी हा अवघड काळ आहे. राज्यासाठी ही कठीण वेळ आहे आणि या संकटात आम्ही तिन्ही पक्षातील सर्वजण एकत्र आहोत. आमचे सरकार राज्यात पूर्ण पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, यात शंका नाही. आम्ही सर्वच विषयांवर चर्चा करतो. आमच्यात काही फरक नाही.सध्याच्या काळात अशा मोठ्या संकटात जनतेचे दु: ख कमी करण्यासाठी आपले प्रयत्न झाले पाहिजेत. ही वेळ राजकारण करण्याची नाही. यावेळी ज्याच्याकडे कोणतेही काम नाही, तो सरकार पाडण्याच्या विचार करू शकतो. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याला भेट दिल्यावर पवार म्हणतात,'आम्ही दररोज संभाषण करतो. यात काही नवीन नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर मी त्यांच्या घरी गेलो नव्हतो, म्हणून मी तिथे गेलो, असंही पवारांनी सांगितलं आहे. 

हेही वाचा

लडाखमध्ये चिनी सैन्याकडून भारतीय जवानांवर दगडफेक अन् नव्याच शस्त्रानं हल्ला; लष्कराचं जबरदस्त प्रत्युत्तर

CoronaVirus News: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का?; राणेंच्या 'त्या' विधानावर फडणवीस बोलले

"नारायण राणे अस्वस्थ, 'ती' अस्वस्थता त्यांना सत्तेपासून दूर बसू देत नाही"

CoronaVirus News : धक्कादायक! उबर इंडियानं ६०० कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

....म्हणून उद्धव ठाकरे अन् राज्यपालांची भेट घेतली, शरद पवारांनी सांगितलं 'कारण'

ज्योतिरादित्य शिंदे दिल्लीतून भोपाळमध्ये परतणार; मध्य प्रदेश काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

CoronaVirus : चिनी राष्ट्रपतींच्या पत्नीचं WHOशी काय आहे कनेक्शन?; संकटात येणार संघटना

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवार