शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

शरद पवार आणि मुरली मनोहर जोशी यांना ‘लोकमत’ जीवनगौरव सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 11:56 AM

शरद पवार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांची निवड संसदीय कारकिर्दीच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी झाली.

- हरिश गुप्ता नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्यसभा सदस्य शरद पवार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांची निवड संसदीय कारकिर्दीच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी झाली आहे. संसदीय लोकशाही बळकट करण्यासाठी या दोघांनी दिलेल्या योगदानामुळे लोकमत पार्लमेंट ज्युरी बोर्डाने त्यांची एकमताने निवड केली. हे दोघेही केंद्रीय मंत्रिमंडळात होते व प्रदीर्घ राजकीय प्रवासात त्यांनी अनेक संसदीय समित्यांचे नेतृत्व केले होते.राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व भाजपाचे लोकसभा सदस्य निशिकांत दुबे यांची उत्कृष्ट संसदपटू म्हणून ज्युरी बोर्डाने निवड केली आहे. आझाद यांच्या कार्याचा राज्यसभेकडूनही सन्मान झाला होता. निशिकांत दुबे यांचे सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवरील योगदान दिल्याबद्दल कौतुक झाले आहे. दुबे २००९ पासून सार्वजनिक जीवनात आहेत. ज्युरी बोर्डाने राज्यसभा व लोकसभेच्या चार महिला सदस्यांही त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल निवड केली आहे. चित्रपटातून राजकारणात आलेल्या हेमामालिनी यांची निवड संसदेत व संसदेबाहेरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आहे.रमा देवी यांची निवड लोकसभेच्या उत्कृष्ट महिला सदस्य म्हणून झाली आहे. हेमा मालिनी यापूर्वी राज्यसभेच्या सदस्य होत्या. रमा देवी तिसऱ्यांदा लोकसभेच्या सदस्य झाल्या आहेत. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले असून त्या बिहारमधून राष्ट्रीय जनता दलातर्फे बाराव्या लोकसभेत निवडून आल्या आहेत. त्या बिहार सरकारमध्ये मंत्रीही होत्या. द्रविड मुन्नेत्र कळघमच्या (द्रमुक) राज्यसभा सदस्य व दिवंगत नेते करुणानिधी यांच्या कन्या कणिमोळी यांची निवड उत्कृष्ट संसदपटू (राज्यसभा) म्हणून झाली आहे. कणिमोळी कवयित्री व पत्रकारही आहेत. छाया वर्मा यांची उत्कृष्ट नवोन्मुख संसद सदस्य (राज्यसभा) म्हणून झाली आहे. वर्मा प्रथमच सदस्य झाल्या आहेत. त्या रायपूरमधून काँग्रेसतर्फे राज्यसभेत २०१६ मध्ये बिनविरोध निवडून आल्या.या आठ विजेत्यांना १३ डिसेंबर रोजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सायंकाळी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये पुरस्कार प्रदान केले जातील. लोकमत प्संसदीय पुरस्कारांची कल्पना लोकमत मिडिया ग्रुपचे चेअरमन विजय दर्डा यांची आहे. हे पुरस्कार पहिल्यांदा २०१७ मध्ये विज्ञान भवनातील शानदार समारंभ देण्यात आले. यावर्षी पुरस्कारांसाठी जुलैमध्ये ज्युरी बोर्ड नक्की केले होते. त्याने आठ गटांतील विजेते निवडण्यासाठी मेहनत घेतली. आठ जणांची निवड करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या ७८० सदस्यांच्या कामगिरीची छाननी केली.केंद्रीय मंत्रिमंडळ व गेल्या वर्षीच्या विजेत्यांना यातून वगळण्यात आले. ज्युरी मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुरली मनोहर जोशी होते व त्यांनी स्वत: जीवनगौरव पुरस्कारासाठी स्वत:चे नाव विचारात घेण्यास त्यांनी स्पष्ट विरोध केला. मात्र ज्युरी बोर्डाने त्यांचा विरोध अमान्य करून, त्यांची निवड केली. त्या चर्चेच्या वेळी डॉ. जोशी गैरहजर राहिले होते.

टॅग्स :Lokmat Parliamentary Awards 2018लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८Sharad Pawarशरद पवारParliamentसंसद