गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी शांताराम नाईक यांची नियुक्ती

By Admin | Updated: July 7, 2017 15:52 IST2017-07-07T15:51:17+5:302017-07-07T15:52:04+5:30

काॅंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गोव्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून शांताराम नाईक यांची नियुक्ती केली आहे. आज शुक्रवारी त्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला.

Shantaram Naik appointed Goa Congress State President | गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी शांताराम नाईक यांची नियुक्ती

गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी शांताराम नाईक यांची नियुक्ती

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 07 -  काॅंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गोव्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून शांताराम नाईक यांची नियुक्ती केली आहे. आज शुक्रवारी त्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला.
नाईक हे राज्यसभेचे विद्यमान खासदार आहेत. त्यांची मुदत राज्यसभा खासदार म्हणून याच महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येणार आहे. त्यांनी यापूर्वी देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेले आहे.
विद्यमान प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी गेल्याच आठवडय़ात आपल्याला पदमुक्त करण्याची विनंती सोनिया गांधी यांच्याकडे केली होती. फालेरो हे शनिवारी आपल्या पदाची सूत्रे शांताराम नाईक यांच्याकडे सोपवणार असल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: Shantaram Naik appointed Goa Congress State President