शंभुराजेंचे जीवन म्हणजे धगधगते अग्निकुंड बंडातात्या कराडकर : श्रीक्षेत्र तुळापूर येथे अभिवादन

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:14+5:302015-03-20T22:40:14+5:30

लोणीकंद : छत्रपती संभाजीमहाराज यांचे जीवनचरित्र म्हणजे धगधगते अग्निकुंड आहे. राजांचा इतिहास आजही तरुणांना प्रेरणा देणारा आहे, असे राष्ट्रीय कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी केले.

Shambhakragya's life means shocking Agnikunda rebel Karadkar: Greetings at ShriKhetra Tulapur | शंभुराजेंचे जीवन म्हणजे धगधगते अग्निकुंड बंडातात्या कराडकर : श्रीक्षेत्र तुळापूर येथे अभिवादन

शंभुराजेंचे जीवन म्हणजे धगधगते अग्निकुंड बंडातात्या कराडकर : श्रीक्षेत्र तुळापूर येथे अभिवादन

णीकंद : छत्रपती संभाजीमहाराज यांचे जीवनचरित्र म्हणजे धगधगते अग्निकुंड आहे. राजांचा इतिहास आजही तरुणांना प्रेरणा देणारा आहे, असे राष्ट्रीय कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी केले.
श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे छत्रपती संभाजीमहाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सभेत कराडकर बोलत होते.
अध्यक्षस्थानी आमदार बाबूराव पाचर्णे होते. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमप, ज्ञानेश्वर वाळके, सुभाषअप्पा जगताप, दत्तात्रय गायकवाड, दादासाहेब सातव, कैलास सोनवणे, बबुशा ढेरंगे, रवींद्र कंद, प्रदीप कंद, सुभाष गायकवाड, सुनील वागस्कर आदी उपस्थित होते.
बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली खास व्यसनमुक्ती युवक संघाच्या वतीने धर्मवीर संभाजीराजे शक्ती ज्योत शौर्य यात्रेचे आयोजन केले होते. पेडगाव ते तुळापूर अशी चारचाकी, दुचाकी रॅली काढण्यात आली. या ाध्ये ५०० युवक सहभागी झाले होते.
छ. शिवाजींच्या वेशातील विशाल बोडके (तळेगाव दाभाडे) व छ. संभाजींच्या वेशातील महेश राक्षे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सरपंच सुनील वागस्कर, संघटनेचे अध्यक्ष विलास जावळ, प्रा. नारायण गवळी, सचिव हेमंत शिंदे, सुषमा जिठे, शारदा वागस्कर, शंकरराव वागस्कर, नामदेव खुळे, प्रियंका खंडे, भानुदास साकोरे, राजाराम साकोरे, आदी उपस्थित होते. शहाजी काळे यांनी आभार मानले.

संगमेश्वर (रत्नागिरी) ते संगमेश्वर (तुळापूर) अशी पदयात्रा व्यसनमुक्ती संघटनेच्या वतीने पुढील वर्षी काढण्यात येणार आहे. यामध्ये सहभागासाठी २०० युवकांनी नोंदणी केली.

फोटो ओ ळ :
छ. संभाजीमहाराज पुण्यतिथीनिमित्त विविध क्षणचित्रे.

Web Title: Shambhakragya's life means shocking Agnikunda rebel Karadkar: Greetings at ShriKhetra Tulapur