शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात, माजी मंत्र्याशीही होतं कनेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:43 IST

Shakur Khan : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या शकूर खानला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. शकूर खान राजस्थानच्या जैसलमेरचा रहिवासी आहे.

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या शकूर खानला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. शकूर खान राजस्थानच्या जैसलमेरचा रहिवासी आहे. संशयास्पद हालचाली दिसल्याने सुरखस यंत्रणा त्याच्यावर नजर ठेवून होत्या. तापसादरम्यान समोर आलं की, शकूर हा पाकिस्तानी दूतावासात काम करणाऱ्या दानिश आणि सोहेल कमर याच्या संपर्कात होता. इतकंच नाही तर त्याने अनेकदा पाकिस्तानी दूतावासाच्या चकरा मारल्या होत्या. 

पाकिस्तानी दूतावासात कार्यरत असलेल्या दानिशच्या मदतीने शकूर खानने पाकिस्तानच्या व्हिसावर अनेक वेळा पाकिस्तानला भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानात असताना, शकूरने आयएसआय एजंट्सशी संपर्क साधल्याचा आणि व्हॉट्सअॅपद्वारे महत्त्वाची माहिती शेअर केल्याचा आरोप आहे.

सीमेपलीकडील लोकांशी संपर्कशकूर खानकडे इस्लामाबादमधील काही लोकांचे फोन नंबर असल्याची बाब उघडकीस आली आहे. यामुळे तो सीमेपलीकडील लोकांशी संवाद साधत होता, आणि त्यांच्याशी महत्त्वपूर्ण माहिती शेअर करत असल्याचा संशय आहे. सीमेपलीकडील लोकांना तो देशाची संवेदनशील माहिती देत असल्याचा आरोप आहे.

माजी मंत्र्यांशी संबंधशकूर खान जिल्हा रोजगार कार्यालयात नोकरी करतो, तसेच तो माजी काँग्रेस मंत्री सालेह मोहम्मद यांचा स्वीय सहाय्यक होता. सालेह मोहम्मद यांच्या मूळ गाव भागूपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या बडोदा गावातील मंगलियाओं धानी या गावात शकूरचे कुटुंब राहते.

माजी काँग्रेस मंत्र्यांशी असलेले कनेक्शन समोर आल्यानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांनी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना देशभक्ती दाखवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "मंत्र्यांच्या सहाय्यकाला गुप्त माहिती मिळवण्याची संधी मिळलीच असेल. जर ती माहिती त्याने शत्रू देशाला दिली असेल, तर ही चिंतेची बाब आहे."

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJyoti Malhotraज्योती मल्होत्रा