शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

RBI गव्हर्नर म्हणून शक्तिकांत दास यांची निवड अयोग्य- सुब्रमण्यम स्वामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 13:22 IST

भाजपाचे खासदार आणि नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आरबीआयचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

नवी दिल्ली- भाजपाचे खासदार आणि नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आरबीआयचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आरबीआयचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास हे आपल्या पदाचा दुरुपयोग करू शकतात, अशीही भीती सुब्रमण्यम स्वामींनी व्यक्त केली आहे. शक्तिकांत दास  यांनी अनेक न्यायालयीन प्रकरणात माजी अर्थमंत्री चिदंबरम यांचा वाचवण्याचा प्रयत्न केला होता. सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्रही लिहिलं आहे. 1980च्या बॅचही माजी आयएएस अधिकारी शक्तिकांत दास यांची मंगळवारी भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली. नोटाबंदीचा प्रभाव जनतेवर पडू नये, यासाठी शक्तिकांत दास यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. ऊर्जित पटेल हे कार्यकाळ अपुरा ठेवलेले 1990नंतरचे रिझर्व्ह बँकेचे दुसरे गव्हर्नर ठरले आहेत. या आधी रघुराम राजन यांनी केंद्र सरकारने दिलेली मुदतवाढ नाकारली होती. तर एस. वेंकटरामन यांनीही आपली मुदत संपण्याआधी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला होता.ऊर्जित पटेल हे रिझर्व्ह बँकेचे 24वे गव्हर्नर होते. ब्रिटिशांनी 1935मध्ये या बँकेची स्थापना केली. त्यावेळी ‘गव्हर्नर-जनरल’ हे बँकेचे प्रमुख होते. बँकेचे पहिले दोन प्रमुख ब्रिटिश होते. त्यानंतर 1949मध्ये बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्यावेळी बँकेचे प्रमुखपद ‘गव्हर्नर’ म्हणून निश्चित झाले. 1992च्या उदारीकरणापर्यंत बँकेच्या गव्हर्नरपदाचा कार्यकाळ तीन वर्षांचा निश्चित करण्यात आला होता. उदारीकरणानंतर या पदाचा कार्यकाळ पाच वर्षे इतका करण्यात आला. नियुक्ती करताना पहिली तीन वर्षांची व त्यानंतर दोन वर्षांची मुदतवाढ, असे सूत्र ठरले. त्यामध्ये एस. वेंकटरामन (2 वर्षे), रघुराम राजन (3 वर्षे) व आता ऊर्जित पटेल (2 वर्षे 97 दिवस) यांनी तिघांनीही हा कार्यकाळ पूर्ण केला नाही. ऊर्जित पटेल हे १९९० नंतर सर्वात कमी काळ राहिलेले गव्हर्नर ठरले आहेत.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी