नव्या टीममधून शहांनी वरुण गांधींना वगळले
By Admin | Updated: August 17, 2014 02:45 IST2014-08-17T02:45:29+5:302014-08-17T02:45:29+5:30
भाजपाचे नवे अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी पक्ष पदाधिका:यांच्या नव्या टीमची घोषणा केली.

नव्या टीममधून शहांनी वरुण गांधींना वगळले
>भाजपा पदाधिका:यांची घोषणा : विजया रहाटकर, पूनम महाजन, सहस्रबुद्धे, श्याम जाजू यांना संधी
नवी दिल्ली : भाजपाचे नवे अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी पक्ष पदाधिका:यांच्या नव्या टीमची घोषणा केली. रा.स्व. संघाचे राम माधव यांना सरचिटणीस तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांना उपाध्यक्ष म्हणून स्थान मिळाले आहे. राजनाथसिंग यांच्या काळात सरचिटणीस राहिलेल्या वरुण गांधी यांना मात्र वगळण्यात आले. औरंगाबादच्या माजी महापौर विजया रहाटकर यांना महिला मोर्चाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्याचबरोबर विनय सहस्रबुद्धे, पूनम महाजन, श्याम जाजू यांनाही विविध पदांवर संधी देण्यात आली आहे.
शहा यांनी अध्यक्षपदी नियुक्तीच्या एक आठवडय़ानंतर नव्या पदाधिका:यांची घोषणा केली. 8 सरचिटणीस, 11 उपाध्यक्ष, 14 सचिव आणि 1क् प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली, त्यापैकी 5 प्रवक्ते नवे आहेत. मेनका गांधी मोदी सरकारमध्ये महिला आणि बाल कल्याण मंत्री आहेत. त्यामुळे त्यांचे पुत्र सुल्तानपूरचे खासदार वरुण गांधी यांना स्थान देण्यात आले नसल्याचे सूत्रंनी सांगितले. जगतप्रकाश नड्डा, राजीव प्रताप रुडी, मुरलीधर राव, राम माधव, सरोज पांडेय, भूपेंद्र यादव, रामशंकर कठेरिया आणि रामनाथ हे 8 नवे सरचिटणीस आहेत. बंडारू दत्तात्रेय, बी.एस. येदियुरप्पा, सत्यपाल मलिक, मुख्तार अब्बास नकवी, पुरुषोत्तम रूपाला, प्रभात झा, रघुवर दास, किरण माहेश्वरी, विनय सहस्रबुद्धे, रेणुदेवी, दिनेश शर्मा यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
श्याम जाजू, अनिल जैन, एच. राजा, रोमेन डेका, सुधा यादव, पूनम महाजन, रामविचार नेताम, अरुणसिंग, सिद्धार्थनाथ सिंग, आर.पी. सिंग, श्रीकांत शर्मा, ज्योती धुव्रे, तरुण चुघ, रजनीश कुमार हे सचिव तर अरुण जैन कार्यालय सचिव आहेत. शहनवाज हुसेन, सुधांशू त्रिवेदी, मीनाक्षी लेखी, एम.जे. अकबर, विजय सोनकर शास्त्री, ललिताकुमार मंगलम्, नलीन कोहली, डॉ. संविद पात्र, अनिल वलूनी आणि जी.व्ही.एल. नरसिंहा राव हे प्रवक्तेपदाची जबाबदारी सांभाळतील. राम माधव, सरोज पांडे, भूपेंद्र यादव आणि कठेरिया हे चौघे नवे सरचिटणीस आहेत. राम माधव रा.स्व. संघातून आले आहेत. सरोज यापूर्वी महिला आघाडीच्या अध्यक्ष होत्या.
शहांची यंग टीम..
शहा यांच्या नव्या चमूत मागासवर्गीय पाच जण असून, सहा महिला तसेच अनुसूचित जाती-जमातींच्या लोकांना स्थान मिळाले आहे. टीममध्ये 80 टक्के लोक 60 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत. भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या युवा नेत्या पूनम महाजन सचिवाची भूमिका बजावतील. लवकरच विधानसभा निवडणुका होत असलेल्या महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडला सर्वाधिक प्रतिनिधित्व मिळाले.