शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

'शाह-जादा' ला सत्तेचा सहारा! झंडा ऊंचा रहे हमारा! राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 21:19 IST

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा मुलगा जय शाह याच्या कंपनीवरील आर्थिक अनियमिततेवरून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

मुंबई - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा मुलगा जय शाह याच्या कंपनीवरील आर्थिक अनियमिततेवरून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून जय शाह यांच्या कंपनीचा टर्नओव्हर 16,000 टक्के वाढल्याचं वृत्त द वायरने दिलं होतं. त्यावरून राहुल यांनी अमित शाह आणि भाजपाला लक्ष्य केलं आहे. 

राहुल गांधी यांनी द वायर या न्यूज वेबसाइटच्या हवाल्याने जय शाह आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.  ''शाह-जादा को सत्ता का कानूनी सहारा! झंडा ऊंचा रहे हमारा!'' असं ट्विट करताना राहुल यांनी द वायरचं एक वृत्त शेअर केलं आहे. जय शाह याच्यावर राज्य सरकार मेहेरबान असून त्यांना राज्यसरकारद्वारे मदत मिळत आहे असं या वृत्तात म्हटलं आहे. त्याचाच सहारा घेत राहुल यांनी ट्विटरद्वारे भाजपावर टीका केली आहे. 

जय शहा प्रकरण उघड झाल्यानंतर काँग्रेस पक्षानं आणि मुख्यतः राहुल गांधींनी आक्रमक पवित्रा  स्वीकारला आहे. 

काय आहे प्रकरण -‘द वायर’ या वेबसाईटच्या वृत्तानुसार, 2004 मध्ये अमित शाह यांचा मुलगा जय शाहने टेंपल इन्टरप्रायझेज नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीत अमित शाह यांच्या पत्नी सोनल शाह व्यवस्थापक बनल्या. 2013 पर्यंत कंपनीने विशेष कमाई केली नाही. पण केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर कंपनीचा टर्नओव्हर 80 कोटी रुपये झाला. एक वर्षात जय शाह यांच्या कंपनीचा टर्नओव्हर 16,000 टक्के वाढला.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शाहJay Shahजय शाह