बापानेच केले मुलीवर लैंगिक अत्याचार
By Admin | Updated: March 24, 2015 23:33 IST2015-03-24T23:07:12+5:302015-03-24T23:33:47+5:30
नाशिक : पित्यानेच स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना टाकळी फाटा परिसरात घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीने भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ २७ फेब्रुवारी २०१५ च्या रात्री ही मुलगी घरात झोपलेली असताना या पित्याने तिच्यावर अत्याचार केला़ तसेच ही गोष्ट कुणाला सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ ही मुलगी आपल्या मामाकडे गेल्यानंतर तिने घडलेला प्रकार आपल्या आजीला सांगितला़ यानंतर तिच्या आईला कळवल्यानंतर त्यांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ भद्रकाली पोलिसांनी या पित्यास अटक केली आहे़(प्रतिनिधी)