भाजपाच्या वकिलाने केले लैंगिक शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 03:47 IST2018-04-24T03:47:16+5:302018-04-24T03:47:16+5:30

आरोपीचे नाव के. पी. प्रेम अनंत आहे. तो मद्रास उच्च न्यायालयात वकिली करतो.

Sexual harassment done by BJP advocate | भाजपाच्या वकिलाने केले लैंगिक शोषण

भाजपाच्या वकिलाने केले लैंगिक शोषण

चेन्नई : भाजपातर्फे २००६ साली आर. के. नगर मतदारसंघातून तामिळनाडू विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या वकिलाला ट्रेनमध्ये नऊ वर्षे वयाच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक केली आहे. आरोपीचे नाव के. पी. प्रेम अनंत आहे. तो मद्रास उच्च न्यायालयात वकिली करतो. आपण भाजपाचे नेते व वकील असून, तुम्ही मला अटक करू शकत नाही, असे त्याने पोलिसांनाही धमकावले. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Web Title: Sexual harassment done by BJP advocate

टॅग्स :BJPभाजपा