शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकवर सेक्स टेप बॉम्ब! सीडी कांडात अडकलेले जारकीहोळी म्हणाले, एकटाच नाही १२० जण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 18:14 IST

मी गेली दीड वर्ष वाट पाहत आहे, शिवकुमार यांनी सीडी बाहेर काढून माझे आयुष्य बरबाद केलेय. - जारकीहोळी

भाजपाचे आमदार आणि बेळगाव परिसरातील नेते माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आज राज्य सरकारकडे सेक्स सीडी स्कँडल प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी खास पत्रकार परिषद घेतली. याद्वारे त्यांनी कर्नाटकातील काँग्रेसचे चाणक्य डी के शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

सेक्स सीडी कांडामध्ये राज्यातील शेकडो नेते, बेंगळुरुतील बडे बडे अधिकारी अडकले आहेत. माझ्याकडे १२० जणांचे पुरावे आहेत. या प्रकरणात महिलेसह माजी पत्रकार नरेश आणि सहा लोकांना अटक करण्यात यावी, असा गौप्यस्फोट जारकीहोळी यांनी केला आहे.

शिवकुमार यांनी राजकीय दृष्ट्या संपविण्यासाठी कट रचला होता आणि माझा व्हिडीओ बनविला होता, असा आरोप त्यांनी केला आहे. मी गेली दीड वर्ष वाट पाहत आहे, शिवकुमार यांनी सीडी बाहेर काढून माझे आयुष्य बरबाद केलेय. कोणतीही चूक केली नाही, तरीही भोगावे लागत आहे. मी माझ्याकडील पुरावे सीबीआयला देईन. १९८५ मध्ये हेच शिवकुमार आणि मी राजकारणात आलेलो. मी रॅडोचे घड्याळ घालायचो, तर शिवकुमार माझ्याकडे फाटक्या चपलाने आलेले. आता त्यांच्याकडे हजारो कोटींची मालमत्ता आहे, असा आरोप जारकीहोळी यांनी केला आहे. 

जारकीहोळी यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांची चौकशी करणार्‍या विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणात बी अहवाल दाखल केला होता. यामध्ये आरोप किंवा इतर आरोप सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत, असे म्हटले होते. यामुळे जारकीहोळी पुन्हा मंत्रिपदासाठी प्रय़त्न करत आहेत. परंतू, निवडणुकीमुळे भाजपा रिस्क घेण्याच्या तयारीत नाहीय. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस