ढोंगीबाबा आश्रमातच चालवत होता सेक्स रॅकेट
By Admin | Updated: March 15, 2017 17:32 IST2017-03-15T16:52:39+5:302017-03-15T17:32:12+5:30
आश्रमात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा मध्य प्रदेश पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मध्य प्रदेशमधील उज्जैन जिल्ह्यात

ढोंगीबाबा आश्रमातच चालवत होता सेक्स रॅकेट
>ऑनलाइन लोकमत
उज्जैन, दि. 15 - आश्रमात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा मध्य प्रदेश पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मध्य प्रदेशमधील उज्जैन जिल्ह्यात पोलिसांनी हे सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केले असून, या रॅकेटचा म्होरक्या एक पुजारी असल्याचे समोर आले आहे.
तंत्रामंत्राच्या आडून बाहेरून मुली आणि महिलांना आणून हे सेक्स रॅकेट चालवले जात होते. मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान या रॅकेटचा म्होरक्या असलेला पुजारी फरार झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राघवी पोलीस ठाणे क्षेत्रातील बालेरा गावात एक ढोंगी बाबा आपल्या आश्रमामध्ये अनैतिक कृत्ये करत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली होती.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राघवी ठाण्याचे टीआय दिनेश भोजक आपल्या पथकासह या या आश्रमाच्या ठिकाणी गेले. तेथे एक कॉलगर्ल दोन व्यक्तींसह आक्षेपार्ह स्थितीत सापडली. या तिघांनाही अटक करण्यात आली. मात्र गोंधळाचा फायदा घेऊन बोगस बाबा रामदास तिथून पसार झाला.
हा बाबा आपल्याकडे तंत्रसिद्धी असल्याचा दावा करत असे. मात्र त्याच्या आडून तो असे काही धंदे चालवत असेल याची कल्पना गाववासियांना नव्हती. दरम्यान, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार रामदास बाबाचा शोध सुरू आहे.