रामकुंडावरील चोरीप्रकरणी नव्याने सात गुन्हे दाखल
By Admin | Updated: September 16, 2015 23:38 IST2015-09-16T23:38:08+5:302015-09-16T23:38:08+5:30
नाशिक : दुसर्या पर्वणीत रामकुंडावर स्नान करणार्या नागरिकांच्या सोन्याची चेन, महिलांचे मंगळसूत्र, रोख रक्कम चोरी होण्याच्या घटना कायम आहेत़ पर्वणीनंतरही भाविकांची शहरात गर्दी कायम असल्याने त्याचा चोरट्यांना चांगलाच फायदा झाल्याचे समोर आले आहे़ पंचवटी पोलीस ठाण्यात दुसर्या पर्वणीपासून आतापर्यंत तब्बल २४ चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून २० लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी हात साफ केले आहेत़

रामकुंडावरील चोरीप्रकरणी नव्याने सात गुन्हे दाखल
न शिक : दुसर्या पर्वणीत रामकुंडावर स्नान करणार्या नागरिकांच्या सोन्याची चेन, महिलांचे मंगळसूत्र, रोख रक्कम चोरी होण्याच्या घटना कायम आहेत़ पर्वणीनंतरही भाविकांची शहरात गर्दी कायम असल्याने त्याचा चोरट्यांना चांगलाच फायदा झाल्याचे समोर आले आहे़ पंचवटी पोलीस ठाण्यात दुसर्या पर्वणीपासून आतापर्यंत तब्बल २४ चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून २० लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी हात साफ केले आहेत़पंचवटी पोलीस ठाण्यात मंगळवारी सात नवीन गुन्हे दाखल झाले आहेत़ त्यामध्ये हिरावाडीतील गुंजाळबाबानगरमधील विणा रमेशकुमार जैसवाल (५९) यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांची सोन्याची चेन, रवींद्र अशोक गवळी (शिखरेवाडी,नाशिकरोड), सुनीता किशोर निकुंभ, शकुंतला मनोहर गुजर (रा. धुळे), नितीन मधुकर बुधले, मदन विठ्ठलराव दोंदे (५३,रा. मखमलाबाद) व जयश्री सुनील आळणे (२३, रा.वैद्यनगर, नाशिकरोड) यांच्या गळ्यांतील एक लाख ९३ हजार रु पयांच्या सोन्याची चेन, मंगळसूत्र पर्वणीच्या दिवशी चोरीला गेले होते़सोमवारी (दि़१४) सकाळी ७ वाजेच्या सुमारास गांधी ज्योतजवळ रूपसिंग रणसिंग पवार (७१, रा. सातपूर) यांच्या गळ्यातील ३० हजार रु पयांची सोन्याची चेन खेचून चोरट्याने पळ काढला तर माधव त्र्यंबक कुलकर्णी (५१, रा. राजीवनगर) हे स्नानासाठी रामकुंड परिसरात आले असता त्यांच्या गळ्यातील ७० हजार रु पये किमतीची सोन्याची चेन चोरीस गेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)