सुरक्षा दलाची मोठी कारवाई, छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर चकमकीत ७ नक्षलवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 12:26 IST2024-12-01T12:15:46+5:302024-12-01T12:26:54+5:30

रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.

Seven Naxalites killed in police encounter in Telangana's Mulugu | सुरक्षा दलाची मोठी कारवाई, छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर चकमकीत ७ नक्षलवाद्यांचा खात्मा

सुरक्षा दलाची मोठी कारवाई, छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर चकमकीत ७ नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगड-तेलंगणा सीमा भागात सुरक्षा दलाच्या पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील एतुरागरामच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला. तसेच, चकमकीनंतर पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. चालपाका जंगल परिसरात ही चकमक झाली. या चकमकीत मारल्या गेलेल्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या काही प्रमुख नेत्यांचाही समावेश असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

सुरक्षा दल इथुरुनाग्राममधील चालपाकाजवळील जंगल परिसरात शोध मोहीम राबवत होते. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य करत गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सात नक्षलवादी ठार झाले. पोलिसांचे पथक अजूनही परिसरात नक्षलवाद्यांचा शोध घेत आहेत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.  दरम्यान, या चकमकीत ठार झालेल्या काही नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. यामध्ये कुरसम मंगू, एगोलाप्पू मल्लैया, मुसाकी देवल, मुसाकी जमुना, जय सिंह, किशोर आणि कामेश यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून अनेक आधुनिक शस्त्रे जप्त केली आहेत.

२०२६ पर्यंत नक्षलवादी नष्ट करण्याचे उद्दिष्ट!
या वर्षाच्या सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजधानी रायपूरमध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यामध्ये त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात सतत मोहीम चालवण्याबाबत बोलले होते. २०२६ पर्यंत नक्षलवाद्यांचा संपूर्ण खात्मा करण्याचे लक्ष्य त्यांनी दिले होते. त्या संदर्भात छत्तीसगड पोलिस सातत्याने मोहीम राबवत आहेत. तेव्हापासून आतापर्यंत ९६ चकमकी झाल्या आहेत. त्यापैकी ८.८४ कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या २०७ नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केले आहे.
 

Web Title: Seven Naxalites killed in police encounter in Telangana's Mulugu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.